तेव्हा शमुवेलाने सर्वकाही त्यास सांगितले; त्याच्यापासून काही लपवून ठेवले नाही. मग एली म्हणाला, तो “परमेश्वरच आहे. त्यास बरे वाटेल ते तो करो.”
TSK
TSK · मीखा 7:9
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
नाबाल मेला असे दावीदाने ऐकले, तेव्हा तो म्हणाला, “ज्याने माझ्या अपमानाचा सूड नाबालावर उगवला आहे आणि ज्याने आपल्या सेवकाला वाईट करण्यापासून आवरून धरले तो परमेश्वर धन्यवादीत असो. परमेश्वराने नाबालाची दुष्टाई त्याच्याच मस्तकावर परत घातली आहे.” मग दावीदाने अबीगईलेकडे सेवकाला पाठवून तिला आपली पत्नी करण्याविषयीची गोष्ट काढली.
अबीशयला आणि इतर सर्व सेवकांना राजा पुढे म्हणाला, माझा पोटचा मुलगा अबशालोमच माझ्या जिवावर उठला आहे, तर हा बन्यामिनी हे असे करत आहे तर त्यामध्ये नवल काय. त्यास हवे ते म्हणू द्या, कारण परमेश्वरानेच त्यास सांगितले असेल.
परंतु माझा मार्ग त्यास कळाला आहे, जेव्हा तो माझी परीक्षा घेतो, तेव्हा मी सोन्यासारखा असेन.
तेव्हा, तू जेव्हा असे म्हणशील की देव तुला दिसत नाही तेव्हा देव तुझ्याकडे लक्ष देणार नाही तर तू त्याची वाट पाहत रहा!
तो तुझे न्यायीपण प्रकाशासारखे आणि तुझा निष्पापपणा मध्यान्हाप्रमाणे दाखवील.
तू माझा वाद चालव आणि माझा उद्धार कर. तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे.
तुझा देव, प्रभू परमेश्वर, जो आपल्या कैवार घेतो, तो असे म्हणतो, मी थरकापाचा प्याला, माझ्या क्रोधाच्या प्याल्यातला गाळ तुझ्या हातातून घेतला आहे. तो तू पुन्हा पिणार नाहीस,
“इस्राएल विखुरलेले मेंढरू आहे आणि सिंहाने दूर पळवून लावले आहे. प्रथम अश्शूराच्या राजाने त्यास खाल्ले; मग यानंतर, बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याने त्याचे हाडे मोडून टाकली आहेत.”
परमेश्वराने आपली नितीमत्ता जाहीर केली आहे. या, परमेश्वर आमचा देव याची कृत्ये आपण सीयोनांत सांगू या.
“परमेश्वर न्यायीच आहे, कारण मी त्याच्या आज्ञेविरूद्ध बंड केले आहे. सर्व लोकांनो, ऐका! आणि माझे दु:ख पाहा! माझ्या कुमारी व माझे तरुण पाडावपणांत गेले आहेत.
तुम्ही माझ्याकडे परत याल. मग दुष्ट मनुष्य आणि चांगला मनुष्य यातील फरक तुम्हास कळेल. देवाला अनुसरणारा व न अनुसणारा यातील फरक तुम्हास समजेल.”
म्हणून योग्य समय येईपर्यंत म्हणजे प्रभू येईपर्यंत न्यायनिवाडा करुच नका. तो अंधारामध्ये दडलेल्या गोष्टींवर प्रकाश टाकील व अंतःकरणातील हेतू उघडकीस आणील, त्यावेळी देवाकडून प्रत्येकाची प्रशंसा होईल.
आता पुढे माझ्यासाठी जो नितीमत्वाचा मुकुट ठेवला आहे, तो त्यादिवशी नीतिमान न्यायाधीश प्रभू मला देईल आणि केवळ मलाच नव्हे, तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय आहे त्या सर्वांनाही देईल.
ते मोठ्याने ओरडून म्हणाले, हे “स्वामी तू पवित्र व सत्य आहेस तू कोठपर्यंत न्यायनिवाडा करणार नाहीस आणि पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांपासून आमच्या रक्ताचा सूड घेणार नाहीस?”