पृथ्वी अंदाधुंद व रिकामी होती. जलाशयावर अंधकार होता, देवाचा आत्मा पाण्यावर पाखर घालत होता.
TSK
TSK · नहू 2:10
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
मी पाण्यासारखा ओतला जात आहे, आणि माझी सर्व हाडे निखळली आहेत. माझे हृदय मेणासारखे झाले आहे. जे माझ्या आतल्या आत विरघळले आहे.
आणि राज्याचे अधिक कौतुक, खास्द्यांच्या वैभवाचा अभिमान अशी बाबेल, तिला सदोम आणि गमोराप्रमाणे देवाकडून उलथून टाकण्यात येईल.
यास्तव माझ्या कंबरेत वेदना भरल्या आहेत, प्रसुती वेदनेप्रमाणे तडफडणाऱ्या स्त्री प्रमाणे त्या वेदनांनी मला पकडले आहे. जे मी ऐकले त्यामुळे मी खाली वाकलो आहे, जे मी पाहिले त्यामुळे मी विचलीत झालो.
तो रात्र व दिवस पेटत राहील. त्याचा धूर निरंतर वर चढत जाईल. ती पिढ्यानपिढ्यापासून ओसाड पडेल; सर्वकाळपर्यंत कोणी तिच्यावरून चालणार नाही.
विचारा व पाहा जर पुरुष बालकाला जन्म देईल. प्रत्येक तरुण पुरुषाचा हात प्रसवणाऱ्या स्त्रीप्रमाणे त्याच्या कमरेवर दिला आहे हे मी का पाहत आहे? त्या सर्वांची चेहरे फिक्के का पडली आहेत?
तेव्हा राजाचा चेहरा पडला तो चिंतातूर झाला, त्याचे पायाचे सांधे साथ देईना आणि त्याचे गुडघे लटपटू लागले.
असे होईल की, जो कोणी तुला पाहील तो तुजपासून पळेल आणि म्हणेल, निनवेचा नाश झाला आहे; तिच्यासाठी कोण रडणार? कोठून मी तुझ्यासाठी सांत्वन करणारे शोधू?
मी राष्ट्रांचा व त्यांच्या किल्ल्यांचा नाश केला आहे. मी त्यांच्या रस्त्यांचा नाश केला आहे व आता येथून कोणीही जात नाही. त्यांची शहरे नष्ट झाली, त्यामुळे तिथे कोणीही राहत नाही.