त्या दोघांनी दोन मवाबी स्त्रिया पत्नी म्हणून केल्या. एकीचे नाव अर्पा व दुसरीचे नाव रूथ होते. ते तेथे जवळपास दहा वर्षे राहिले.
TSK
TSK · नहे 13:23
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
¶ या सर्व गोष्टी झाल्यावर अधिकारी माझ्याकडे येऊन म्हणाले, “इस्राएल लोक, याजक आणि लेवी हे इतर देशाच्या लोकांपासून वेगळे राहत नसून व ते कनानी, हित्ती, परिज्जी, यबूसी, अम्मोनी, मवाबी, मिसरी आणि अमोरी यांच्याप्रमाणेच घृणास्पद कृत्ये करतात.
एज्रा याजक त्यांच्यासमोर उभा राहून म्हणाला, “तुम्ही देवाचे वचन पाळले नाही. परक्या स्त्रियांशी तुम्ही विवाह केलेत. या कृत्यामुळे इस्राएलाच्या अपराधात तुम्ही भर टाकली आहे.
¶ पण जेव्हा सनबल्लट, तोबीया, अरबी, अम्मोनी आणि अश्दोदी यांचा मात्र फार संताप झाला. लोकांनी यरूशलेमेच्या भिंतीचे काम सुरुच ठेवले आहे हे त्यांनी ऐकले. भिंतीला पडलेली भगदाडे ते बुजवत आहेत हे ही त्यांच्या कानावर आले.
शब्बाथ दिवशी किंवा दुसऱ्या कोणत्याही पवित्र दिवशी आमच्या भोवतीच्या प्रदेशातील लोकांनी धान्य किंवा इतर काही वस्तू विकायला आणल्या तर त्यांची खरेदी आम्ही करणार नाही. प्रत्येक सातव्या वर्षी आम्ही जमीन पडीत ठेवू. तसेच त्यावर्षी सर्व देणेकऱ्यांना आम्ही ऋणातून मुक्त करु.
¶ विश्वास न ठेवणार्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका; कारण नीतिमान व अनाचार ह्यांची भागी कशी होणार? प्रकाश व अंधकार ह्यांचा मिलाप कसा होणार?