TSK

TSK · गण 14:8

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

त्यांना मिसऱ्यांच्या हातून सोडवून त्यांना त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात, दुधामधाचे प्रवाह ज्यात वाहत आहेत, कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी यांच्या प्रदेशात घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे.

परमेश्वराचे तुमच्या पूर्वजांवर फार प्रेम होते. त्या प्रेमाखातीर त्याने इतरांना वगळून तुम्हास आपले मानले. आजही वस्तूस्थिती तिच आहे.

राजा दावीद सादोकाला म्हणाला, हा देवाचा कोश यरूशलेमेला परत घेऊन जा. परमेश्वराची कृपा असेल तर तो मला पुन्हा येथे आणेल. यरूशलेम आणि हे त्याचे मंदिर मला पुन्हा पाहता येईल.

परमेश्वर देव थोर आहे, तुझ्यावर प्रसन्न होऊन त्याने तुला इस्राएलाचा राजा केले आहे. परमेश्वर इस्राएलावर प्रेम करतो म्हणून, नियमशास्त्राचे व न्यायाचे पालन करण्यास त्याने तुला राजा केले आहे.”

ते म्हणतात “तो परमेश्वरावर विश्वास ठेवतो, तर परमेश्वर त्यास सोडवो. त्याने त्यास वाचवावे, कारण तो त्याच्याठायी हर्ष पावतो.”

जे परमेश्वराचा आदर करतात, जे त्याच्या दयेची आशा धरतात त्यांच्याबरोबर तो आनंदित होतो.

¶ नंतर मी त्यांचे चांगले करण्यास आनंद करीन. मी आपल्या सर्व अंत:करणाने आणि जिवाने त्यांची या देशात प्रामाणिकपणे लागवड करेन.

¶ मग या गोष्टींविषयी आपण काय म्हणावे? जर देव आपल्या बाजूला आहे, तर मग आपल्या विरुद्ध कोण?