TSK

TSK · गण 19:11

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

¶ परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनाचे पुत्र, जे याजक त्यांना असे सांग की, आपल्या लोकांमधील मरण पावलेल्या मनुष्यास स्पर्श करून याजकाने स्वत:ला अशुद्ध करून घेऊ नये.

¶ अहरोनाच्या वंशापैकी कोणी महारोगी किंवा स्त्राव होणारा असला तर त्याने शुद्ध होईपर्यंत पवित्र केलेले पदार्थ खाऊ नयेत. हा नियम अशुद्ध झालेल्या प्रत्येक याजकाला लागू आहे. प्रेताला स्पर्श केल्यामुळे किंवा वीर्यपातामुळे अशुद्ध झालेला मनुष्य,

¶ त्याने आपल्या स्वतःला परमेश्वरासाठी वेगळे केलेल्या सर्व दिवसात, त्याने प्रेताजवळ जाऊ नये.

तू इस्राएल लोकांशी बोल. म्हण, जर तुमच्यापैकी कोणी किंवा तुम्ही प्रेतामुळे अशुद्ध झाला किंवा लांबच्या प्रवासावर असला, तरी त्याने परमेश्वरासाठी वल्हांडण सण पाळावा.

तुम्ही प्रेताला केवळ हात जरी लावला असला तरीही तुम्ही बाहेर रहावे. तिसऱ्या दिवशी तुम्ही स्वत:ला आणि तुमच्या कैद्यांना शुद्ध करा. हीच गोष्ट पुन्हा सातव्या दिवशीही करा.

देश शुद्ध करण्यासाठी, इस्राएल घराणे, सात महिने त्यांना पुरीत राहिल.

¶ मग हाग्गय म्हणाला, “जर प्रेताला स्पर्श केल्यामुळे, कोणी अशुद्ध झालेला यापैकी कशासही स्पर्श केला, तर ते अशुद्ध होईल का?” याजक म्हणाले, “हो! तेसुध्दा अशुद्ध होईल.”

आणि म्हणून ‘प्रभू म्हणतो की, त्यांच्यामधून बाहेर या आणि वेगळे व्हा; अशुद्ध त्यास शिवू नका; म्हणजे मी तुम्हास स्वीकारीन.

तर ज्याने सार्वकालिक आत्म्याकडून निष्कलंक अशा स्वतःस देवाला अर्पिले, त्या ख्रिस्ताचे रक्त तुमच्या विवेकभावांस जिवंत देवाची सेवा करण्यासाठी निर्जीव कृत्यांपासून किती विशेषेकरून शुद्ध करील?