पाहा, होरेब डोंगरावरील एका खडकावर मी तुझ्यापुढे उभा राहीन, त्या खडकावर ती काठी आपट, त्यातून पाणी निघेल. म्हणजे ते हे लोक पितील,” मोशेने हे सर्व इस्राएलांच्या वडिलासमोर केले.
TSK
TSK · गण 20:11
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
तुझी काठी घे. तुझा भाऊ अहरोन याला आणि त्या लोकांस बरोबर घे आणि खडकाजवळ जा. लोकांसमोर खडकाशी बोल. नंतर त्या खडकातून पाणी वाहू लागेल आणि तू ते पाणी त्या लोकांस आणि त्यांच्या जनावराना देऊ शकशील.
तेव्हा देवाने लेहीमधील खोलगट जागा दुभंगून फोडली, आणि त्यातून पाणी निघाले; जेव्हा तो ते प्याला, तेव्हा त्यास परत शक्ती आली आणि त्याच्या जीवात जीव आला. यावरुन त्या जागेचे नाव एन-हक्कोरे पडले; ती जागा आजपर्यंत लेहीमध्ये आहे.
तर मग तू परमेश्वराचे वचन का पाळले नाही? तू तर लुट पकडून परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते का केले?
वृध्द संदेष्टा या यहूदातील देवाच्या मनुष्यास म्हणाला, “तू परमेश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन केले आहेस, असे परमेश्वर म्हणाला, तू त्याच्या आज्ञेप्रमाणे वागला नाहीस.
मग दावीद म्हणाला, “फक्त लेवींनाच देवाचा कोश वाहून आणण्याची परवानगी आहे. या कामासाठी आणि सर्वकाळ परमेश्वराची सेवा करण्यासाठीच त्यांची निवड झाली आहे.”
त्याने रानात खडक फोडला, आणि समुद्राची खोली पुरे भरण्यापर्यंत त्यांना विपुल पाणी दिले.
तो खडक पाण्याच्या तळ्यात, कठीण खडक पाण्याच्या झऱ्यात बदलतो.
‹आणि जे काही मी तुम्हास शिकविले आहे ते त्या लोकांस पाळायला शिकवा आणि पाहा, युगाच्या शेवटापर्यंत मी सदोदित तुमच्याबरोबर आहे.”›
कारण मनुष्याच्या रागामुळे देवाचे नीतिमत्त्वाचे कार्य घडत नाही.