TSK

TSK · गण 31:6

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

अहरोनाचे मुले, याजक, यांनीच कर्णे वाजवावीत. हा तुमच्या लोकांस पिढ्यानपिढ्याचा कायमचा नियम आहे.

¶ परंतु लोकांनी मोशेवर विश्वास ठेवला नाही. ते उंच डोंगरावरच्या प्रदेशात गेले. परंतु मोशे आणि परमेश्वराचा आज्ञापटाचा कोश त्यांच्याबरोबर गेला नाही.

रिम्मोन-पेरेस सोडल्यावर त्यांनी लिब्नाला तळ दिला.

सात याजकांनी एडक्याच्या शिंगाचे सात कर्णे घेऊन कराराच्या कोशापुढे चालावे; सातव्या दिवशी तुम्ही नगराला सात प्रदक्षिणा घालाव्यात आणि याजकांनी कर्णे वाजवावेत,

मग लोकांनी शिलोकडे माणसे पाठवली, आणि करुबाच्या वर राहणारा सैन्यांचा परमेश्वर याच्या साक्षपटाचा कोश तेथून आणला आणि तेथे एलीचे दोन पुत्र हफनी व फिनहास हे परमेश्वराच्या कराराच्या कोशाबरोबर होते.

शौलाने अहीयाला म्हटले, “देवाचा कोश इकडे आण.” कारण त्या वेळी देवाचा कोश इस्राएल लोकांच्यामध्ये होता.

उरीया दावीदाला म्हणाला, पवित्र कराराचा कोश, इस्राएलचे सैनिक, आणि यहूदा हे राहुट्यांमध्ये राहत आहेत. माझा धनी यवाब आणि महाराजांचे (दावीदाचे) सेवक ही खुल्या मैदानात तळ देऊन आहेत. अशावेळी मीच तेवढे घरी जाऊन खाणेपिणे करणे आणि पत्नीच्या सहवासात झोपणे योग्य होणार नाही.

जो अबीशूवाचा मुलगा, जो फिनहासचा मुलगा आणि जो एलाजाराचा मुलगा, जो प्रमुख याजक अहरोन याचा मुलगा.