¶ तो अशा कोणत्याही गोष्टीविषयी दोषी ठरला तर त्याने पाप केलेली बाब कबूल करावी;
TSK
TSK · गण 5:7
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
¶ ज्या पवित्र वस्तूची विटंबना करून त्याने पाप केले असेल तिची त्याने भरपाई करावी आणि तिच्या किंमतीचा पाचवा हिस्सा रक्कम त्याने याजकाला द्यावी; ह्याप्रकारे याजकाने हा दोषार्पणाचा मेंढा अर्पून त्या मनुष्याकरिता प्रायश्चित करावे; आणि मग त्याची क्षमा होईल.
किंवा एखाद्या कामाबद्दल खोटी शपथ वाहीली तर ती त्याने पूर्ण भरून द्यावी ज्या वस्तुचा त्याने अपहार केला असेल तिची पूर्ण भरपाई आपल्या दोषार्पणाच्या दिवशी करून देऊन त्या वस्तूंच्या किंमतीचा पाचवा हिस्सा अधिक भरावा;
¶ परंतु कदाचित ते आपली पापे व आपल्या वाडवडीलांची पापे व त्यांनी माझ्याविरूद्ध अपराध केला व माझ्या विरुध्द चालले हे कबूल करतील.
नंतर तो लोकांस कबुली देईल. तो म्हणेल, ‘मी पापकर्म केले. मी पाप केले चांगल्याचे वाईट केले. पंरतू माझ्या पापाला शिक्षा झाली नाही.
एखाद्याने आपले पाप लपवले तर त्याची उन्नती होत नाही, पण एखाद्याने त्याच्या पापांची कबुली दिली आणि ते सोडून दिले तर त्याच्यावर दया दाखवण्यात येईल.
जर आम्ही असे म्हणतो की, आमच्यामध्ये कोणतेही पाप नाही, तर आम्ही स्वतःला फसवतो आणि आपल्याठायी सत्य नाही.