TSK

TSK · ओब 1:9

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

त्यांच्याशी भांडू नका. त्यांच्यातली तसूभरही जमीन मी तुम्हास देणार नाही. कारण सेईर डोंगर मी एसावाला वतन म्हणून दिला आहे.

ईयोबाचे तीन मित्र म्हणजे अलीफज तेमानी, बिल्दद शूही आणि सोफर नामाथी या तिन्ही मित्रांनी त्याच्यावर आलेल्या संकटाविषयी ऐकले होते, ईयोबाला भेटून त्याच्यासोबत शोक करण्यास आणि त्याचे सांत्वन करावे याबद्दल त्यांचे एकमत झाले, तेव्हा ते आपआपल्या ठिकाणाहून आले.

¶ त्या दिवशी मिसरी बायकांसारखे होतील. ते थरथर कापतील आणि भयभीत होतील कारण सेनाधीश परमेश्वर आपला हात वर उंचावेल तो त्यांच्यावर उगारील.

¶ जो अदोमाहून येत आहे, जो लाल वस्रे घातलेला बस्राहून येत आहे, तो कोण आहे? जो राजेशाही वस्त्रे असलेला, जो त्याच्या महान शक्तीमुळे आत्मविश्वासाने कूच करीत आहे, तो कोण आहे? जो न्यायीपणाने बोलणारा, आणि तारायला सामर्थ्य आहे, तो मीच आहे.

म्हणून अदोमाविरूद्ध परमेश्वराने ठरवलेली योजना काय आहे? तेमानाच्या रहिवाश्याविरूद्ध त्याने जी योजना तयार केली ती ऐका; ते खचित लहानातील लहान कळपालासुद्धा ओढून नेतील. त्यांची कुरणाचे देश ओसाड जागेत बदलतील.

जे कोणी भविष्यासाठी वचन सांगतात त्यांच्याविरुद्ध तलवार आली आहे, याकरिता की, ते आपल्यास मूर्खाप्रमाणे प्रकट करतील. तिच्या सैनिकांविरूद्ध तलवार येत आहे, अशा रीतीने ते दहशतीने भरतील.

म्हणून मी तेमानावर अग्नी पाठवीन, ती बस्राचे राजवाडे खाऊन टाकील.”

आणि एसावाच्या पर्वताचा न्याय करायला तारणारे सीयोन पर्वतावर चढून जातील आणि राज्य परमेश्वराचे होईल.