TSK

TSK · नीति 1:5

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

तेव्हा दावीद अबीगईलेला म्हणाला, “परमेश्वर इस्राएलाचा देव ज्याने तुला आज मला भेटायला पाठवले तो धन्यवादित असो.

“शहाण्या मनुष्यांनो मी काय सांगतो ते ऐका हुशार मनुष्यांनो, माझ्याकडे लक्ष द्या.

जर तुम्ही शहाणे असाल तर मी काय म्हणतो त्याकडे लक्ष द्याल माझ्या तोंडच्या शब्दाकडे कान दे

तुझ्या आज्ञा मला माझ्या शत्रूंपेक्षा ज्ञानी करतात, कारण तुझे नियम नेहमी माझ्याजवळ आहेत.

निंदकाला बोल लावू नको नाहीतर तो तुझा द्वेष करेल; ज्ञान्यास बोल लाव आणि तो तुझ्यावर प्रेम करील.

ज्याला शिक्षण प्रिय त्यास ज्ञान प्रिय, परंतु जो कोणी शासनाचा द्वेष करतो तो मूर्ख आहे.

निंदकाला तडाखा मार म्हणजे भोळा समंजस होईल, बुद्धिमानाला शब्दाचा मारा कर म्हणजे त्यास ज्ञान कळेल.

मी तुमच्याशी बुद्धीमान लोक समजून बोलत आहे. मी काय बोलत आहे याचा तुम्हीच न्याय करा.