परंतु मी फारोचे मन कठोर करीन. मग मी मिसर देशामध्ये आपल्या सामर्थ्याची अनेक चिन्हे व अनेक आश्चर्ये दाखवीन.
TSK
TSK · नीति 21:1
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
¶ पारसाचा राजा कोरेश ह्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी यिर्मयाच्या तोंडून परमेश्वराने दिलेले वचन पूर्ण व्हावे याकरीता परमेश्वराने राजा कोरेश्याच्या आत्म्याला प्रेरणा दिली. कोरेशाने त्याच्या राज्यामध्ये घोषणा केली, त्याने जे सांगितले व लिहिले होते ते असे आहे.
बेखमीर भाकरीचा सण त्यांनी उत्साहाने सात दिवस साजरा केला. कारण देवाच्या, इस्राएलाच्या देवाच्या मंदिराच्या कामात त्यांचे हात मजबूत करायला परमेश्वराने अश्शूरच्या राजाचे मन त्यांच्याकडे फिरवून त्यांना आनंदीत केले.
तेव्हा, हे परमेश्वरा, मी तुला विनवणी करतो की, तुझ्या सेवकाच्या प्रार्थनेकडे आणि जे तुझे सेवक तुझ्या नावाचे भय धरून आदर दाखवित आहेत त्या सेवकांची ही प्रार्थना तू ऐक. आता आज तुझ्या सेवकाला यश दे आणि या मनुष्यावर त्याची कृपादृष्टी होईल असे कर. मी राजाचा पेला धरणारा असा सेवक होतो.
प्रार्थनामंदिराच्या भोवतालच्या व नगराच्या भिंती आणि माझे घर यांच्यासाठी मला मजबूत लाकूड लागणार आहे. त्यासाठी राजाचा वनाधिकारी आसाफ याला पत्र द्यावे.” राजाने मला तशी पत्रे आणि मी मागितले ते सर्वकाही दिले. देवाची माझ्यावर कृपा असल्यामुळे राजाने हे दिले.
तू झरे आणि प्रवाह फोडून उघडले; तू वाहणाऱ्या नद्या कोरड्या केल्या.
आपल्या लोकांचा त्यांनी द्वेष करावा, आपल्या सेवकांशी निष्ठूरतेने वागावे म्हणून त्याने शत्रूचे मन वळवले.
समुद्राने पाहिले आणि पळाला; यार्देन मागे हटली.
मनात योजना करणे मनुष्याच्या हातचे आहे, पण त्याच्या जिव्हेचे उत्तर देणे परमेश्वराकडचे आहे.
मनुष्याच्या पावलास परमेश्वर वाट दाखवतो. तर कोणत्या मार्गाने जावे हे त्यास कसे कळेल?
जो खोल समुद्राला म्हणतो, आटून जा आणि मी तुझे प्रवाह सुकवीन.
भूतलावरील सर्व रहीवासी त्यास शुन्यवत आहेत. तो स्वर्गातील आपल्या सैन्याचे, भूतलावरील रहीवाश्यांचे पाहिजे ते करतो, कोणीही त्यास थांबवू शकत नाही किंवा विचारू शकत नाही की “तू हे का केले?”
¶ तिसऱ्या देवदूताने आपली वाटी नद्यांवर व पाण्याच्या झऱ्यांवर ओतली, “आणि त्यांचे रक्त झाले”