TSK

TSK · नीति 23:10

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

परत लेवींनी म्हणावे, “शेजाऱ्याच्या शेताची हद्द दाखवणारी खूण जो सरकवतो तो शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.

तू विधवांना काहीही न देता घालवून दिले असशील, पोरक्याचे बाहू मोडले असशील.

दुष्ट लोक स्तनपान करणारे बाळ आई जवळून घेतात. ते गरीबाच्या त्याने काढलेल्या कर्जाबद्दल तारण म्हणून त्यांची मुले ठेवून घेतात.

ते विधवांना आणि उपऱ्यांचा जीव घेतात, आणि ते अनाथांचा खून करतात.

कारण जर तू आपला मार्ग नीट केलास आणि चांगले ते केलेस, जर तू शेजारी आणि मनुष्यांमध्ये पुर्णपणे न्याय केला,

परमेश्वर असे म्हणतो, “न्याय आणि न्यायीपण कर, आणि जो कोणी लूटलेला आहे, त्यास पीडणाऱ्याच्या हातातून सोडव. तुझ्या देशात राहणाऱ्या परदेशी, अनाथ, विधवा, कोणालाही त्रास देऊ नको, त्यांचे काही वाईट करू नको किंवा निरपराध्यांचे रक्त पाडू नको.

“मग मी तुमच्याकडे न्याय निवाडा करण्यासाठी येईन. आणि जादूटोणा, व्यभिचार, खोटी शपथ वाहणारे, आणि जे मोलकऱ्याला मोलाविषयी आणि विधवेला व अनाथाला पीडतात, आणि परराष्ट्रीयांचा न्याय विपरीत करतात, आणि माझे भय धरीत नाही यांच्याविरूद्ध मी त्वरीत साक्षी होईन,” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो.