TSK

TSK · नीति 24:10

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

पण आता संकटे तुझ्यावर आली आहेत, आणि तू खचला आहेस, ते तुला स्पर्श करतात. आणि तू त्रासात पडतोस.

देशातील जे वर्तमान ऐकण्यात येईल त्यांने भिऊ नका अथवा आपले हृदय खचू देऊ नका. कारण एका वर्षात वर्तमान येईल. यानंतर पुढच्या वर्षात वर्तमान येईल, आणि देशात हिंसाचार होईल. राज्यकर्ते राज्यकर्त्याविरूद्ध होतील.

¶ म्हणून, आमच्यावर देवाची दया झाल्यामुळे ही सेवा आम्हास देण्यात आली आहे, म्हणून आम्ही खचत नाही.

तुम्ही खचून जाऊ नये आणि धीर सोडू नये म्हणून ज्याने पापी लोकांचा इतक्या मोठ्या प्रमाणातील विरोध सहन केला, त्याचा विचार करा.

¶ ‹मला माहीत आहे जेथे सैतानाचे राजासन आहे. तेथे तुम्ही राहता. तरीही तुम्ही माझे नाव घट्टपणे धरून राहिला आहात. जेथे सैतान राहतो तेथे माझा विश्वासू साक्षीदार अंतिपा जो तुम्हामध्ये जिवे मारला गेला त्याच्या दिवसातही तू माझ्यावरील विश्वास नाकारला नाहीस.›