TSK

TSK · नीति 27:17

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

ते यहोशवाला म्हणाले, “खरोखर हा सर्व देश परमेश्वराने आपल्या हाती दिला आहे, आपल्या भीतीमुळे या देशाचे सर्व रहिवाशी गळून गेल्यासारखे झाले आहेत.”

परंतु सर्व इस्राएली लोक, आपला नांगराचा फाळ, आपली कुदळ, आपली कुऱ्हाड, आणि विळ्यांना धार लावण्यासाठी खाली पलिष्ट्यांकडे जात.

यवाब अबीशयला म्हणाला, अरामी मला भारी पडत आहेत असे दिसले, तर तू माझ्या मदतीला ये. जर अम्मोनी प्रबल आहेत असे लक्षात आले तर मी तुझ्या मदतीला येईन.

सुगंधी द्रव्य आणि सुवास हृदय आनंदीत करतात. पण मित्राचा गोडपण त्याच्या सल्ल्यापेक्षा उत्तम आहे.

दुर्बल हातांना बळकट करा आणि थरथर कापणारे गुडघे घट्ट करा.

तो असा की, या संकटात कोणी घाबरू नये; कारण आपण ह्यासाठीच नेमिलेले आहोत. हे तुम्ही स्वतः जाणून आहात.

आणि या कारणामुळे मीसुद्धा दुःख भोगीत आहे. परंतु मी लाजत नाही कारण ज्याच्यावर मी विश्वास ठेवला आहे त्यास मी ओळखतो आणि माझी खात्री पटली आहे की, तो दिवस येईपर्यंत त्याने जे माझ्याकडे सोपवले आहे त्याचे तो रक्षण करील.

कारण त्या सुवार्तेमुळे मी दुःख सहन करत आहे, येथपर्यंत की गुन्हेगाराप्रमाणे साखळदंडानी मला बांधण्यात आले, पण देवाचे वचन बांधले गेले नाही.

¶ माझ्या बंधूंनो, ज्या ज्या वेळी तुमच्यावर निरनिराळया परीक्षा येतात तेव्हा तुम्ही आनंदच माना.