परमेश्वरा, ऊठ! त्यांच्यावर हल्ला कर! त्यांच्या तोंडावर त्यांना पाड! तुझ्या तलवारीने तू माझा जीव दुष्टापासून वाचव.
TSK
TSK · स्तोत्र 6:4
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
हे परमेश्वरा, माझे तरुणपणाचे पाप आणि माझा बंडखोरपणा आठवू नको. तू आपल्या प्रेमदयेला अनुसरून आपल्या चांगुलपणामुळे माझी आठवण कर.
हे देवा, शत्रू किती वेळ माझा अपमान करील? शत्रू तुझ्या नावाची निंदा सर्वकाळ करणार काय?
आमच्याविरूद्ध आमच्या पूर्वजांची पापे आठवू नकोस. तुझी करुणा आमच्यावर लवकर होवो, कारण आम्हास तुझी नितांत गरज आहे.
कारण माझ्यावर तुझी महान दया आहे; तू माझा जीव मृत्यूलोकापासून सोडवला आहेस.
नंतर मी परमेश्वराच्या नावाचा धावा केला, “हे परमेश्वरा, मी तुला विनंती करतो, मला वाचव.”
हे परमेश्वरा, जे कोणी आपल्या ओठाने खोटे बोलतात, आणि आपल्या जिभेने फसवतात त्यापासून माझा जीव सोडीव.
माझ्या भल्यासाठीच या दुःखांचा अनुभव मला आहे. तूच मला नाशाच्या खळग्यातून वाचवले आहेस. कारण माझी सर्व पापे तू मागे फेकली आहेस.
तुमच्या पूर्वजांच्या दिवसांपासून तुम्ही माझे नियम अनुसरण्याचे सोडून भलतीकडे वळले आहात, ते तुम्ही पाळले नाहीत. माझ्याकडे फिरा म्हणजे मी तुमच्याकडे फिरेन,” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “पण तुम्ही म्हणता, ‘आम्ही कसे परत फिरावे?’
यासाठी की, येशू ख्रिस्तामध्ये त्याची आम्हांवरील प्रीतीच्याद्वारे येणाऱ्या युगात त्याची महान कृपा दाखविता यावी.