TSK

TSK · प्रक 21:10

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

ते त्यास म्हणाले, “आता पाहा, तुझ्या दासाकडे कडे पन्नास धष्टपुष्ट माणसे आहेत. त्यांना जाऊन तुझ्या स्वामीचा शोध घेऊ दे. कदाचित् परमेश्वराच्या आत्म्याने एलीयाला वर नेऊन कोठेतरी डोंगर किंवा दरीमध्ये टाकले असेल.” अलीशा म्हणाला, “नाही, त्यांना पाठवू नका.”

मग देवाने दाखवलेल्या दृष्टांतात हाताच्या आकृती प्रमाणे येऊन माझ्या डोक्याच्या केसास धरुन देवाच्या आत्म्याने मला स्वर्ग आणि पृथ्वीच्या मध्यभागी उचलून घेतले, त्याने मला यरूशलेमेला नेले उत्तरेच्या आतील भागाच्या वेशी जवळ तेथे एक मूर्ती चिडवण्यासाठी उभी होती.

आणि देवाच्या आत्म्याने मला दृष्टांतात उंच नेले व खास्द्यांच्या देशात हद्दपार नेले. आणि दृष्टांतात मला वर उचलून नेले असे मी पाहिले.

उरलेली जमीन, पंचवीस हजार हात लांबीच्या प्रदेशापैकी जो पांच हजार हात रुंदीचा भाग राहील तो नगरासाठी सार्वजनिक, कुरणासाठी, घरे बांधण्यासाठी उपयोगात येईल. नगर ह्याच्या मध्यावर असावे.

मला एक ख्रिस्तातील मनुष्य माहीत आहे; तो चौदा वर्षांपूर्वी (शरीरात की शरीराबाहेर हे मला माहीत नाही, देवाला माहीत आहे) तिसर्‍या स्वर्गापर्यंत नेला गेला.

त्याच क्षणी आत्म्याने माझा ताबा घेतला. तेथे स्वर्गात माझ्यासमोर राजासन होते कोणीएक त्यावर बसला होता.

आणि मी ती पवित्र नगरी, नवे यरूशलेम, देवाकडून स्वर्गातून खाली येत असलेली बघितली. ती वरासाठी साज चढवून सजविलेल्या वधूप्रमाणे दिसत होती;