TSK

TSK · रोम 1:7

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

बन्यामीन विषयी मोशे म्हणाला, “बन्यामीन परमेश्वरास प्रिय आहे. तो परमेश्वरापाशी सुरक्षित राहील. देव त्याचे सदोदित रक्षण करील. आणि परमेश्वराचे वास्तव्य त्याच्या देशात राहील.”

¶ (स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे) माझे बहिणी, माझे वधू, मी माझ्या बागेत गेलो. मी माझा गंधरस व माझी सुगंधी द्रव्ये जमा केली आहेत. मी माझा मध मधाच्या पोळ्यासहीत खाल्ला आहे. मी माझा द्राक्षरस व दूध प्यालो आहे. मित्रांनो, खा. माझ्या प्रियांनो; प्या, मनसोक्त प्या.

‹तर तुम्ही त्यांच्यासारखे असू नका कारण तुम्हास कशाची गरज आहे हे तुमच्या पित्याला तुम्ही त्याच्याकडे मागण्यापूर्वीच ठाऊक आहे.›

ते दगडमार करीत असता स्तेफन प्रभूचा धावा करीत म्हणाला, “हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.”

¶ त्यांपैकी तुम्हीही येशू ख्रिस्ताचे होण्यास बोलावलेले आहात.

किंवा उंची किंवा खोली किंवा दुसरी कोणतीही निर्मिती आपला प्रभू ख्रिस्त येशू ह्याच्याठायी असलेल्या देवाच्या प्रीतीपासून आपल्याला वेगळे करू शकणार नाही.

करिंथ शहरात असलेल्या देवाच्या मंडळीस, म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेले आणि पवित्रजन होण्यास बोलावलेले आहेत त्यांना व आपला प्रभू येशू ख्रिस्त, म्हणजे त्यांचा व आमचाही प्रभू, याचे नाव सर्व ठिकाणी घेणाऱ्या सर्व लोकांस,

¶ देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल आणि बंधू तीमथ्य ह्यांजकडून; करिंथ शहरातील देवाच्या मंडळीस व सर्व अखया प्रांतातील सर्व पवित्र जणांस सलाम,

¶ प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.

¶ बंधूंनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या बरोबर असो. आमेन.

¶ देवपिता आणि प्रभू येशू ख्रिस्तापासून आता बंधूंना विश्वासासह प्रीती आणि शांती लाभो.

आपला देवपिता ह्याला युगानुयुग गौरव असो. आमेन.

कलस्सै शहरातील पवित्र जनांस व ख्रिस्तामधील विश्वासू बांधवांस देव आपला पिता ह्याजकडून तुम्हास कृपा व शांती असो.

ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो. तिच्याकरिता एक शरीर असे पाचारण्यांत आले आहे; आणि तुम्ही कृतज्ञ असा.

आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळे धरलेली सहनशीलता ह्यांची आम्ही निरंतर आठवण करतो.

कारण देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे तर पवित्रेतेसाठी पाचारण केले आहे.

आपला प्रभू येशू ख्रिस्त हा आणि ज्याने आपल्यावर प्रीती करून सर्वकाळचे सांत्वन व चांगली आशा कृपेने दिली तो देव आपला पिता,

आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.

आणि ज्यांचे मालक विश्वास ठेवणारे आहेत त्यांना ते बंधू आहेत म्हणून त्यांचा अपमान करू नये तर अधिक आदराने दास्य करावे कारण ज्यांना सेवेचा लाभ होतो ते विश्वास ठेवणारे व प्रिय आहेत या गोष्टी शिकवून बोध कर.

¶ प्रभू तुझ्या आत्म्यासोबत असो. देवाची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.

देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांजकडून तुम्हास कृपा व शांती असो.

¶ याकोब, देवाचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक, याजकडून, जगभर पांगलेल्या, विश्वास ठेवणाऱ्या बारा यहूदी वंशांना नमस्कार.

परंतु तुम्हास ज्याने पाचारण केले तो जसा पवित्र आहे तसे तुम्ही आपल्या सर्व वागण्यात पवित्र व्हा.

¶ आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले ह्यात देव पित्याने आपल्याला केवढे प्रीतीदान दिले आहे पाहा आणि आपण तसे आहोत ह्यामुळे जग आपल्याला ओळखीत नाही कारण त्यांनी त्यास ओळखले नाही.

¶ येशू ख्रिस्ताचा दास व याकोबाचा भाऊ यहूदा ह्याजकडून पत्र; देवपित्याला प्रिय असलेल्या व ख्रिस्त येशूसाठी त्याने राखलेल्या, अशा सर्व बोलावलेल्यांस

¶ ‹“इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही:› ‹जो आपल्या उजव्या हातात सात तारे धरतो आणि सात सोन्याच्या समयांमधून चालतो त्याचे हे शब्द आहेत›

¶ ‹पर्गम येथील मंडळीच्या दूताला लिही:› ‹ज्याच्याकडे दोन्ही बाजूंनी धार असणारी दुधारी तलवार आहे, त्याचे हे शब्द आहेत, ›

‹आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.›

¶ ‹लावदीकिया येथील मंडळीच्या दूताला लिही:› ‹जो आमेन, विश्वासू आणि खरा साक्षीदार आहे, देवाच्या निर्मितीवरील सत्ताधीश आहे त्याचे हे शब्द आहेत.›

¶ प्रभू येशूची कृपा देवाच्या सर्व पवित्र लोकांबरोबर असो.