¶ परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे सारेकडे लक्ष दिले, आणि परमेश्वराने सारेला वचन दिल्याप्रमाणे केले.
TSK
TSK · रूथ 1:6
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
इस्राएलाने योसेफाला आशीर्वाद देऊन म्हटले, “ज्या देवासमोर माझे वडील, अब्राहाम व इसहाक चालले, ज्या देवाने माझ्या सर्व आयुष्यभर मला चालवले आहे,
तू जाऊन इस्राएलाच्या वडीलजनांना एकत्रित करून त्यांना सांग की, तुमच्या पूर्वजांचा देव म्हणजे अब्राहाम, इसहाक व याकोब यांचा देव परमेश्वर, याने मला दर्शन देऊन म्हटले की, तुम्हांकडे खरोखर माझे लक्ष गेले आहे व मिसर देशात तुम्हांसोबत काय घडले आहे हे मला कळले आहे.
मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुम्हास खाण्याकरता मी आकाशातून अन्नवृष्टी करीन; प्रत्येक दिवशी या लोकांनी आपल्याला त्या दिवसास पुरेल एवढे अन्न बाहेर जाऊन गोळा करावे. यावरुन ते माझ्या नियमाप्रमाणे चालतात की नाही हे पाहण्यासाठी मी त्यांची परीक्षा पाहीन.
कारण तुझे सेवक तिच्या दगडांची आवड धरतात, आणि तिच्या नासधूसाची धूळ पाहून त्यांना कळवळा येतो.
तो आपल्या विश्वास ठेवणाऱ्यांना अन्न देतो. तो आपला करार नेहमी आठवतो.
सर्वांचे डोळे तुझ्याकडे लागतात. आणि तू त्यांना योग्य वेळी त्यांचे अन्न देतोस.
तो तुझ्या सीमांच्या आत भरभराट आणतो; तो तुला उत्कृष्ट गव्हाने तृप्त करतो.
कारण जसे पाऊस आणि बर्फ आकाशातून खाली पडतात आणि पुन्हा भूमी भिजवल्याशिवाय आणि उत्पन्न करण्यास व अंकुर व पेरणाऱ्यास बीज आणि खाणाऱ्यास भाकर दिल्याशिवाय आकाशात परत जात नाही.
परमेश्वराने आपल्या लोकांस उत्तर देऊन म्हटले, “पाहा, मी तुमच्याकडे धान्य, नवा द्राक्षरस आणि तेल पाठवीन. तुम्ही त्यांनी तृप्त व्हाल, आणि ह्यापुढे, राष्ट्रात तुमची निंदा मी होऊ देणार नाही.
‹आमची रोजची भाकर आज आम्हास दे.›
‹ते तुला, तुझ्या मुलांना तुझ्या भिंतीच्या आत धुळीस मिळवतील व दगडावर दगड राहू देणार नाही कारण तू देवाचा तुझ्याकडे येण्याचा समय तू ओळखला नाही.”›
परराष्ट्रीयात आपले आचरण चांगले ठेवा, म्हणजे तुम्हास दुराचरणी मानून, ते जरी तुमच्याविषयी वाईट बोलतात, तरी तुमची जी चांगली कामे त्यांना दिसतील, त्यावरून त्याच्या भेटीच्या दिवशी त्यांनी देवाचे गौरव करावे.