TSK

TSK · तीत 3:1

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

माझ्या मुला, परमेश्वराचे आणि राजाचे भय बाळग. जे त्यांच्या विरुध्द बंड करीत आहेत त्यामध्ये सामील होऊ नकोस.

तुमचे वरिष्ठ तुमच्यावर रागावले आहेत म्हणून तुम्ही तुमची कामे सोडू नका. शांत राहिल्याने मोठा असह्य संताप शांत होतो.

त्यांचे ऐकू नका. तुम्ही बाबेलाच्या राजाची सेवा करा व जिवंत रहा. या नगराची नासाडी का व्हावी?

तो म्हणाला, ‹“नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत.›

म्हणून माझ्या प्रिय बंधूनो व बहिणींनो प्रभूमध्ये स्थिर आणि अचल राहा. नेहमी स्वतःला प्रभूच्या कार्यासाठी वाहून घ्या कारण तुम्ही जाणता की प्रभूमध्ये तुमचे काम व्यर्थ नाही.

कारण आम्ही देवाच्या हाताची कृती आहोत जी ख्रिस्तामध्ये आहे जेणेकरूण आम्ही जीवनात चांगली कामे करावी जे देवाने आरंभीच योजून ठेवले होते.

ह्यासाठी की, तुम्ही प्रभूला सर्व प्रकारे संतोष देण्यास, प्रत्येक चांगल्या कामात फळ देऊन त्यास शोभेल असे जगावे व देवाच्या ज्ञानाने तुमची वाढ व्हावी.

¶ जर तू या गोष्टी ख्रिस्ती बंधूना शिकविल्या, तर तू जो सत्यात व विश्वासात वाढलास व चांगल्या शिक्षणाला अनुसरलास तो तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील.

¶ या कारणासाठी मी तुला आठवण करून देतो की, देवाचे जे कृपादान माझे हात तुझ्यावर ठेवल्यामूळे तुझ्या ठायी आहे, ते प्रज्वलित कर.

आपल्यासाठी त्याने स्वतःचे दान केले ते ह्यासाठी की, आपली सर्व अनाचारातून सुटका करावी आणि चांगल्या कामात आवेशी असलेले आपले स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करावेत.

आणि आपल्या लोकांनी आपल्या आवश्यक गरजांसाठी चांगली कामे करण्यास शिकण्याची काळजी घ्यावी; म्हणजे ते निष्फळ होणार नाहीत.

¶ प्रत्येक प्रकारच्या मानवी व्यवस्थेला, प्रभूकरता, आज्ञाधारक रहा. राजा श्रेष्ठ म्हणून त्याच्या अधीन राहा.

¶ प्रियजनहो, आता हे दुसरे पत्र मी तुम्हास लिहित आहे, या दोन्हीमध्ये मी तुम्हास आठवण देऊन तुमचे निर्मळ मन जागृत करीत आहे.