कारण परमेश्वराने आपल्या हातात फेसाळलेला पेला धरला आहे, त्यामध्ये मसाला मिसळला आहे आणि तो ओतून देतो. खात्रीने पृथ्वीवरील सर्व दुर्जन शेवटल्या थेंबापर्यंत पितील.
TSK
TSK · जख 12:2
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
तुझा देव, प्रभू परमेश्वर, जो आपल्या कैवार घेतो, तो असे म्हणतो, मी थरकापाचा प्याला, माझ्या क्रोधाच्या प्याल्यातला गाळ तुझ्या हातातून घेतला आहे. तो तू पुन्हा पिणार नाहीस,
¶ कारण परमेश्वर, इस्राएलाचा देव, त्याने मला हे सांगितले: “माझ्या हातातील क्रोधाच्या द्राक्षरसाचा प्याला घे आणि मी तुला पाठवतो त्या सर्व राष्ट्रांना हा द्राक्षरस प्यायला लाव.
¶ कारण परमेश्वर असे म्हणतो, “पाहा, ज्यांची योग्यता नाही त्यांना खचित काही पेला प्यावा लागेल. तर तू स्वतःशी असा विचार करतो की तू शिक्षेशिवाय राहशील? तुला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही, कारण तुला तो खचित प्यावा लागेल.”
कारण मी तिचे सरदार, तिचे ज्ञानी, तिचे अधिकारी आणि तिचे सैनिक मस्त होतील व ते अंत नसणाऱ्या झोपेत झोपतील आणि कधी जागे होणार नाहीत.” असे राजाचे म्हणणे आहे; सेनाधीश परमेश्वर त्याचे नाव आहे.
¶ यहूदाही यरूशलेममध्ये लढेल. भोवतीच्या सर्व राष्ट्रांकडून संपत्ती मिळेल; त्यांना भरपूर सोने, चांदी आणि वस्रे यांचा पूर येईल.
त्या महान नगरीचे तीन भाग झाले; राष्ट्रांची नगरे पडली आणि ती महान बाबेल, तिला त्याच्या कोपाच्या संतापाचा द्राक्षरसाचा प्याला द्यावा, म्हणून देवासमोर स्मरणात आणली गेली.