TSK

TSK · जख 8:3

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

मी माझ्या पवित्र डोंगरावर, सीयोनावर, माझ्या राजास अभिषेक केला आहे.

मी तुझे सर्व न्यायधीश पूर्वी जसे होते तसे करीन, तुझे सर्व सल्लागार सुरवातीस जसे होते तसे करीन, त्यानंतर तुला नीतिमानांची विश्वासू नगरी म्हणतील.”

माझ्या संपूर्ण पवित्र डोंगरावर ते उपद्रव देणार नाहीत व नासधूस करणार नाहीत; कारण सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.

मग रानात न्यायत्वाची वस्ती होईल, फलदायी शेतीत नितीमत्ता वास करील.

लांडगे आणि कोकरे एकत्र चरतील, आणि सिंह बैलाप्रमाणे गवत खाईल. पण धूळ ही सापाचे अन्न होईल. माझ्या पवित्र पर्वतात कोणी उपद्रव किंवा नाश करणार नाही असे परमेश्वर म्हणतो.

जो वाचवू शकत नाही अशा वीर योद्ध्याप्रमाणे तू का गोंधळात आहेस? कारण परमेश्वरा, तू आमच्याबरोबर आहेस. आम्ही तुझ्या नावाने ओळखले जातो, आम्हास सोडून जाऊ नकोस.”

¶ सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, “जेव्हा मी लोकांस परत त्यांच्या देशात आणीन, यहूदाच्या नगरांत व देशात राहणारे ते हे म्हणतील, ‘तुझी धार्मिकतेची जागा जेथे तो राहतो, तू पवित्र पर्वता, परमेश्वर तुझे कल्याण करो!

ते सभोवतीचे अंतर अठरा हजार हात असेल. त्या दिवसापासून नगरीचे नाव ‘परमेश्वर तेथे आहे’ असे पडेल.

मी त्यांच्या रक्ताचा सूड अजून घेतला नाही तो सूड मी घेईन. कारण परमेश्वर सियोनात वस्ती करतो.

परमेश्वर असे म्हणतो, “हे सियोनकन्ये, हर्षित होऊन गा! कारण मी स्वतः येईन व मी तुझ्यात वास्तव्य करीन.”

¶ त्यावेळी, घोड्यांच्या सरंजामावरसुध्दा “परमेश्वरासाठी पवित्र” अशी अक्षरे कोरलेली असतील आणि परमेश्वराच्या मंदिरातीली भांडी, वेदींपुढील कटोऱ्यांइतकीच महत्वाची असतील.

येशूने त्यास उत्तर दिले, ‹“ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील; माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन, त्याच्याबरोबर वस्ती करून राहू.›

संपूर्ण इमारत त्याच्याद्वारे जोडली गेली आणि प्रभूमध्ये पवित्र भवन होण्यासाठी वाढत आहे.

आणि मी राजासनातून एक मोठी वाणी ऐकली; ती म्हणालीः “पाहा, देवाचा मंडप मनुष्यांत आहे, तो त्यांच्याबरोबर वस्ती करील; ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील

तेथे कोणतीही अशुद्ध गोष्ट किंवा अमंगळपणाची कृती करणारा अथवा लबाडी करणारा कोणीही मनुष्य, कोणत्याही प्रकारे प्रवेश करणार नाही पण कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात ज्यांची नावे लिहिण्यात आली आहेत त्यांनाच प्रवेश करता येईल.