TSK

TSK · 1 पेत्र 2:17

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

अब्राहाम म्हणाला, “या ठिकाणी देवाचे भय खात्रीने नाही, म्हणून ते माझ्या पत्नीकरीता मला ठार मारतील, असा विचार मी केला.

तीन दिवसानंतर योसेफ त्यांना म्हणाला, “मी देवाला भितो, म्हणून मी सांगतो तसे करा आणि जिवंत राहा.

¶ वडीलधाऱ्या मनुष्यांना मान द्या; वृद्ध मनुष्य घरात आल्यास उठून उभे राहा; आपल्या देवाचे भय बाळगा. मी परमेश्वर आहे!

¶ तेथे जमलेल्या सर्व लोकांस दावीद म्हणाला, “आता आपल्या परमेश्वर देवाला धन्यवाद द्या.” तेव्हा आपल्या पूर्वजांनी ज्याची उपासना केली त्या परमेश्वरास लोकांनी धन्यवाद दिले. राजाच्या आणि परमेश्वराच्या सन्मानार्थ ते नतमस्तक झाले.

परमेश्वराचे भय ज्ञानाची सुरुवात आहे, मूर्ख ज्ञान आणि शिक्षण तुच्छ मानतात.

माझ्या मुला, परमेश्वराचे आणि राजाचे भय बाळग. जे त्यांच्या विरुध्द बंड करीत आहेत त्यामध्ये सामील होऊ नकोस.

मग मी ऐक्य नावाच्या काठीचे दोन तुकडे केले जेणेकरून यहूदा आणि इस्राएल यांच्यामधील बंधुत्त्व मोडावे.

‹तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे यावरुन सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहात.”›

म्हणून सर्वांना त्यांचे देणे द्या; ज्याला कर त्यास कर, ज्याला जकात त्यास जकात, ज्याला आदर त्यास आदर, ज्याला मान त्यास मान.

ख्रिस्ताच्या भयात राहून एकमेकांचा आदर करून स्वतःला नम्रपणे त्याच्या अधीन करा.

¶ जे सर्व दास म्हणून जुवाखाली आहेत तितक्यानी आपापल्या मालकास सर्व सन्मानास योग्य मानावे यासाठी की देवाचे नाव आणि शिकवण यांची निंदा होऊ नये.

¶ तुम्ही जर आत्म्याच्याद्वारे, सत्याचे आज्ञापालन करून, निष्कपट बंधुप्रेमासाठी आपले जीव शुद्ध केले आहे, तर तुम्ही आस्थेने एकमेकांवर मनापासून प्रीती करा.