TSK

TSK · 2 शमु 21:3

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

दुसऱ्या दिवशी सकाळी मोशेने लोकांस सांगितले, “तुम्ही भयंकर पाप केले आहे! परंतु आता मी परमेश्वराकडे पर्वतावर जातो; काहीतरी करून कदाचित मला तुमच्या पापांचे प्रायश्चित करता येईल.”

जर कोणी एक पुरुष दुसऱ्याविरूद्ध पाप करील तर परमेश्वर त्याचा न्याय करील. पण जर पुरुष परमेश्वराच्या विरूद्ध पाप करील तर त्यासाठी कोण मध्यस्थी करेल?” पण ते आपल्या बापाचे शब्द ऐकेनात कारण त्यांना जिवे मारावे असा देवाचा हेतू होता.

इस्राएलमधील शांतताप्रिय, विश्वासू लोकांपैकी मी एक आहे. इस्राएलच्या एका महत्वाच्या शहराची तुम्ही नासधूस करत आहात. परमेश्वराच्या मालकीच्या वस्तूची तुम्ही मोडतोड का करता?

मी परमेश्वरास काय देऊ? आणि काय घेऊन परात्पर देवासमोर नमन करू? मी होमार्पणे व एक वर्षाचे वासरू घेऊन त्याच्या पुढे यावे का?

कारण बैलांच्या किंवा बकऱ्याच्या रक्ताने पाप नाहीसे होणे अशक्य आहे.