TSK

TSK · दानि 10:9

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

¶ तेव्हा परमेश्वर देवाने मनुष्यास गाढ झोप लागू दिली, आणि तो झोपला असता परमेश्वराने मनुष्याच्या शरीरातून एक बरगडी काढली व ती जागा मांसाने बंद केली.

जेव्हा लोक गाढ झोपेत असतात, मी रात्रीच्या दृष्टांताच्या विचारात असतो,

(ती तरुणी स्वतःशी बोलते) मी झोपलेली आहे. पण माझे हृदय स्वप्नात जागे आहे. माझा प्रियकर दार वाजवतो आणि म्हणतो, माझे बहिणी, माझ्या प्रिये, माझ्या कबुतरा, माझ्या विमले! माझे डोके दहिवराने ओले झाले आहे. माझे केस रात्रीच्या दवबिंदूने ओलसर झाले आहेत.

मी ऐकले तेव्हा माझे अंग थरथरले, माझे ओठ आवाजाने कापले! माझी हाडे कुजण्यास सुरूवात झाली आहे, आणि मी आपल्या ठिकाणी कापत आहे. म्हणून मी धीराने नाशाच्या दिवसाची, शत्रू आमच्यावर हल्ला करील, त्या दिवसाची वाट पाहत आहे.

आणि जेव्हा प्रार्थना करून तो उठला आणि शिष्यांकडे आला तो पाहा ते खिन्न झाल्यामुळे झोपी गेलेले त्यास आढळले.