TSK

TSK · दानि 2:39

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

जो कोरेशाविषयी म्हणतो, तो माझा मेंढपाळ आहे, तो माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करील. तो यरूशलेमेविषयी म्हणेल, ती पुन्हा बांधण्यात येईल आणि मंदिराविषयी म्हणेल, तुझा पाया घातला जाईल.

परेस म्हणजे तुझे राज्य विभागून मेदी आणि पारसी हयांना दिले आहे.”

¶ त्यानंतर मी पुन्हा पाहीले तो आणखी एक श्वापद चित्त्याप्रमाणे होते त्याच्या पाठीवर पक्षासारखे चार पंख होते. आणि त्यास चार शिरे होती. त्यास राज्य करण्यासाठी आधिकार दिला होता.

¶ मी डोळे वर करून पाहिले तो मला माझ्यासमोर दोन शिंग असलेला एडका, नदीकाठी उभा असलेला दिसला. त्याचे एक शिंग दुसऱ्यापेक्षा लांब होते. पण लांब शिंगाची वाढ लहानपेक्षा हळूहळू झाली होती, आणि ते हळू वाढत आहे.

तो बकरा म्हणजे ग्रीसचा राजा, त्याच्या डोळयाच्या मधोमध असलेले शिंग म्हणजे पहिला राजा आहे.

¶ आणि आता मी तुला सत्य प्रगट करतो. पारसात तिन राजे उदयास येतील आणि चौथा राजा इतरांपेक्षा जास्त धनवान होईल जेव्हा तो आपल्या धनाच्या मदतीने बलवान झाला मग तो सर्वांस ग्रीसच्या राज्याच्या विरोधास उठवील.

काळे घोडे उत्तर देशाला, पांढरे घोडे पश्चिम देशाला व ठिपके असलेले राखाडी घोडे दक्षिण देशाला जात आहेत.”