ती आपल्या पित्यास म्हणाली, “मी आपल्यासमोर उभी राहू शकत नाही म्हणून माझ्यावर रागावू नका, कारण माझी मासिकपाळी आली आहे.” अशा रीतीने त्याने शोध केला परंतु त्यास कुलदेवता सापडल्या नाहीत.
TSK
TSK · दानि 4:19
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
तेव्हा तू त्यास असे उत्तर दे, ‘ही जनावरे आपला सेवक याकोब याच्या मालकीची आहेत. त्याने ही माझा धनी एसाव याला भेट म्हणून पाठवली आहेत. आणि पाहा, तो आमच्या पाठोपाठ येत आहे.’”
तेव्हा हन्ना उत्तर देऊन म्हणाली, “असे नाही, माझ्या स्वामी, मी दु:खीत आत्म्याची स्त्री आहे. द्राक्षरस किंवा मद्य मी प्याले नाही, तर मी आपला जीव परमेश्वरा पुढे ओतत आहे.”
नतर दावीदही उठून गुहेतून निघाला आणि शौलाच्या पाठीमागून हाक मारून बोलला, “हे माझ्या प्रभू, राजा.” तेव्हा शौलाने आपल्यामागे वळून पाहिले आणि दावीद आपले तोंड भूमीस लावून नमला
मग तो कूशी आला. तो म्हणाला, माझ्या स्वामीसाठी ही बातमी आहे. तुमच्या विरूद्ध पक्षाच्या लोकांस परमेश्वराने चांगली अद्दल घडवली.
माझे हृदय! माझे हृदय! मी माझ्या हृदयात दु:खी आहे. माझ्याठायी माझे हृदय अनावर झाले आहे. माझ्याने शांत बसवत नाही, कारण हे माझ्या जीवा तू रणशिंग्याचा आवाज, लढाईची ओरड ऐकली आहे.
प्रमुख अधिकाऱ्याने त्यांना, दानीएलास बेल्टशस्सर, हनन्यास शद्रख, मीशाएलास मेशख, अजऱ्यास अबेदनगो, नावे दिली.
राजा आपण, राजाधिराज आहात ज्यास स्वर्गाच्या देवाने राज्य, सामर्थ्य, बल आणि सन्मान दिला आहे.
शेवटी दानीएल आत आला, त्यास मी माझ्या देवाचे नाव बेल्टशस्सर दिले आहे. त्यास मी स्वप्न सांगितले.
उत्तम आत्मा, ज्ञान, विवेक, स्वप्नांचा उलगडा करणे, कोडी स्पष्ट करणे, आणि अडचणी सोडवणे, या गुंणवत्ता ज्या दानीएलात आढळल्या त्यास बेल्टशस्सर नाव दिले. आता त्या दानीएलाला बोलवा म्हणजे तो अर्थ सांगेल.”
त्याने त्यास मोठेपणा दिल्यामुळे सर्व राष्ट्रांचे लोक, दास, भाषा बोलणारे लोक त्याच्यापुढे थरथर कापत व त्यास भित होते. त्यास वाटेल त्यास तो ठार करीत असे, किंवा जीवन देत असे.
¶ या गोष्टींचा उलगडा इथे संपतो. मी दानीएल या विचारांनी व्याकूळ झालो. माझे तोंड उतरले; पण मी या सर्व गोष्टी मनात ठेवल्या.
¶ तो जो मनुष्यासारखा दिसत होता त्याने माझ्या ओठास स्पर्श केला व मी माझे तोंड उघडले आणि जो माझ्यापुढे उभा होता त्याच्याशी मी बोललो, “हे प्रभू या दृष्टांतामुळे माझे मन अधिर झाले आहे आणि माझ्यात बळ राहीले नाही.