TSK

TSK · निर्ग 29:21

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

नंतर अभिषेकाचे तेल त्याच्या डोक्यावर ओतून त्यास अभिषेक कर;

आणि अहरोन व त्याच्या पुत्रांना अभिषेक करून पवित्र कर. मग याजक या नात्याने ते माझी सेवा करतील;

¶ मग मोशेने अभिषेकाचे काही तेल व वेदीवरील काही रक्त घेऊन अहरोन व त्याची वस्त्रे, व त्याच्यासहीत त्याचे पुत्र व त्यांची वस्त्रे ह्यांच्यावर शिंपडले आणि अहरोन व त्याची वस्त्रे व त्याच्याबरोबर त्याचे पुत्र व त्यांची वस्त्रे पवित्र केली.

याजकाने तळहातावर उरलेले तेल शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या डोक्याला परमेश्वरासमोर त्या मनुष्यासाठी प्रायश्चित म्हणून लावावे.

परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा, मार्गदर्शन व सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याजवर येईल,

‹आणि त्यांनीही सत्यांत पवित्र व्हावे म्हणून मी त्यांच्याकरिता स्वतःला पवित्र करतो.›

तर मग ज्याने देवाच्या पुत्राला पायाखाली तुडवले, कराराच्या ज्या रक्ताने त्यास पवित्र केले त्या रक्ताला अपवित्र ठरवले आणि ज्याने कृपेच्या आत्म्याचा अपमान केला, तो मनुष्य किती अधिक दंडास पात्र ठरेल म्हणून तुम्हास वाटते?