TSK

TSK · उत्प 48:5

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

योसेफाने पाहिल्या मुलाचे नाव मनश्शे ठेवले. कारण तो म्हणाला, “देवाने, मला झालेल्या सर्व कष्टांचा व तसेच माझ्या वडिलाच्या घराचा विसर पडू दिला.”

(योसेफास मिसर देशातील ओनचा याजक पोटीफर याची मुलगी आसनथ हिच्या पोटी मनश्शे व एफ्राईम हे पुत्र झाले),

¶ योसेफ पुत्राच्या वंशात म्हणजे एफ्राइम वंशातला अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा, आणि मनश्शे वंशातला पदाहसुराचा मुलगा गमलीयेल.

¶ योसेफाची मुले मनश्शे व एफ्राईम. या प्रत्येकापासून कुळे निर्माण झाली.

वास्तविक पाहता योसेफ वंशाचे दोन वंश मनश्शे व एफ्राइम असे होते, आणि लेव्यांना देशात त्यांनी वाटा दिला नाही, केवळ वस्तीसाठी नगरे, आणि त्यांच्या पशूंसाठी व त्यांच्या मालमत्तेसाठी त्यांना फक्त काही नगरात त्यांची जागा दिली.

¶ रऊबेन इस्राएलाचा थोरला पुत्र होता. पण त्याने आपल्या पित्यांचे अंथरूण अशुद्ध केले म्हणून त्याच्या जेष्ठपणाचे अधिकार योसेफाच्या पुत्रांना दिले. म्हणून थोरला पुत्र म्हणून त्याची नोंद नाही.

तर आता हे याकोबा, ज्या कोणी तुला उत्पन्न केले आणि हे इस्राएला, ज्या कोणी तुला घडवले, तो परमेश्वर असे म्हणतो, भिऊ नकोस, कारण मी तुला खंडणी भरून सोडवले आहे; मी तुला नाव घेऊन बोलावले आहे, तू माझा आहेस.

¶ प्रभू परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही इस्राएलाच्या बारा वंशासाठी जमिनीची विभागणी याप्रमाणे करून द्याल, तेव्हा योसेफाला दोन भाग मिळतील.

¶ आणि मी तुम्हास पिता होईन आणि तुम्ही माझे पुत्र व्हाल, असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतो.’

आशेर वंशापैकी बारा हजारांवर; नफताली वंशापैकी बारा हजारांवर; मनश्शे वंशापैकी बारा हजारांवर;