तू माझ्या मुखातून सत्य वचन काढून घेऊ नको, कारण मी तुझ्या योग्य निर्णयाची प्रतिक्षा करतो.
TSK
TSK · यश 59:21
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
¶ इशायाच्या बुंध्याला अंकुर फुटेल, व त्याच्या मुळातून निघालेल्या शाखेला फळ येईल.
परमेश्वर असे म्हणतो, योग्य वेळेला मी माझी दया दाखवीन, मी तुला उत्तर देईल, आणि तारणाच्या दिवशी मी तुला मदत करेन. मी तुझे रक्षण करेन आणि तुला लोकांचा करार असा देईन. देश पुन्हा बांधायला आणि ओसाड वतन करून घ्यायला,
तुम्ही कान द्या आणि माझ्याकडे या! ऐका, म्हणजे तुमचे जीवन जिवंत राहील! मी खरोखर तुमच्याबरोबर सर्वकाळचा करार करीन, विश्वासाची कृती करून दावीदाशी करार केला.
कारण मी जे नवीन आकाशे व पृथ्वी निर्माण करीन, ती माझ्या समोर अक्षय राहतील. त्याचप्रमाणे तुमची नावे आणि मुले माझ्याबरोबर टिकून राहतील, परमेश्वर असे म्हणतो.
¶ परमेश्वर असे म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की, “मी इस्राएलाच्या व यहूदाच्या घराण्याशी नवा करार करीन.
¶ ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा देव होईन.
जो देश माझा सेवक याकोब याला मी दिला, जेथे तुमचे पूर्वज राहत होते. त्यामध्ये ते वस्ती करतील, तेथे ते व त्यांची मुले, व त्यांची नातवंडे सर्वकाळ तेथे राहतील. दावीद हा माझा सेवक त्यांचा सर्वकाळचा अधिपती होईन.
मी यापुढे आपले मुख त्यांच्यापासून लपविणार नाही, मी आपला आत्मा इस्राएलाच्या घराण्यावर ओतीन.” असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
कारण ज्याला देवाने पाठवले आहे तो देवाची वचने बोलतो कारण तो आत्मा मोजून मापून देत नाही.
त्यावरून येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, ‹“माझी शिकवण माझी नाही तर ज्याने मला पाठविले त्याची आहे.›
‹मी पित्याजवळ जे पाहिले ते बोलतो, तसेच तुम्ही आपल्या पित्याकडून जे ऐकले ते करता.”›
पण तुमच्यात जर देवाचा आत्मा वास करतो, तर तुम्ही देहाचे नाही, पण आत्म्याचे आहात कारण ख्रिस्ताचा आत्मा जर कोणात नसेल तर तो त्याचा नाही.
तर तिच्यापेक्षा पवित्र आत्म्याची सेवा अधिक गौरवयुक्त कशी होणार नाही?
परंतु आता ज्या कराराचा मध्यस्थ ख्रिस्त आहे तो अधिक चांगल्या अभिवचनांनी स्थापित असल्यामुळे, जेवढ्या प्रमाणात तो अधिक चांगला आहे, तेवढ्या प्रमाणात अधिक श्रेष्ठ सेवा त्यास मिळाली आहे.