TSK

TSK · यिर्म 21:14

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

त्यांनी देवाच्या घराला आग लावली, यरूशलेमची तटबंदी उद्ध्वस्त केली, राजा आणि सरदार यांच्या मालकीची घरे जाळली. यरूशलेम येथील प्रत्येक मौल्यवान वस्तू लुटून नेली किंवा नष्ट केली.

मनुष्य आपल्या मुखाच्या फळाकडून चांगल्या गोष्टींच्या योगे तृप्त होतो, त्यास आपल्या हातांच्या कामाचे प्रतिफळ मिळेल.

सीयोन डोंगर व यरूशलेम यासंबंधीचे आपले कार्य संपले तेव्हा प्रभू म्हणेल, अश्शूरच्या राजाच्या उन्मत्त हृदयाचे भाषण व त्याच्या गर्वीष्ठ दृष्टीला मी शिक्षा करीन.

त्या दिवशी असे होईल की परमेश्वर उंच ठिकाणी असलेल्या सैन्याला उंच ठिकाणी, आणि पृथ्वीच्या राजांना पृथ्वीवर शिक्षा करेल.

तू आपल्या सेवकांकडून प्रभूची अवज्ञा करून म्हटले, मी आपल्या पुष्कळशा रथाबरोबर मी पर्वताच्या उंचावर, लबानोनाच्या अगदी आतल्या भागावर चढून आलो आहे, त्याचे उंच गंधसरू, व त्याचे निवडक देवदारू मी तोडीन आणि मी त्याच्या अगदी दूरच्या उंचीवर त्याच्या फळझाडांच्या जंगलात प्रवेश करीत आलो

भाता जळाला आहे, अग्नीतून शिसे जळून निघाले आहे, ते स्वत:ला व्यर्थच गाळीत राहतात, कारण जे दुष्ट ते काढून टाकलेले नाहीत.

यास्तव सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, पाहा! “त्यांना मी शिक्षा करीन. त्यांचे तरुण तलवारीने मरण पावतील. त्यांची मुले आणि त्यांच्या मुली दुष्काळाने मरतील.

पण जर तुम्ही शब्बाथ दिवस पवित्र पाळण्यासाठी माझे ऐकले नाही, जर तुम्ही शब्बाथाच्या दिवशी यरूशलेमेच्या दारात ओझे वाहिले, तर मी दारात कधींही विझू न शकणारी आग लावीन, ही आग यरूशलेमचे राजवाडे खाऊन टाकील आणि ती विझवली जाणार नाही.”

¶ तू चातुर्याने थोर व कृतीने पराक्रमी आहेस कारण प्रत्येकाला त्याच्या आचरणाप्रमाणे व त्याच्या कृतीच्या योग्यतेप्रमाणे फळ द्यावे म्हणून तुझे डोळे लोकांचे मार्ग पाहण्यास उघडे आहेत.

मानवाच्या मुला आपले तोंड दक्षिणेच्या भूमीकडे लाव आणि बोल; नेगेबच्या राना विरुध्द भाकीत कर.

देशात राहणाऱ्या लोकांमुळे व त्यांच्या कृत्यांच्या फळांमुळे ओसाड होईल.

¶ फसू नका, देवाचा उपहास होणार नाही कारण मनुष्य जे काही पेरतो तेच पीक त्यास मिळेल.