एसावावर इसहाकाची प्रीती होती, कारण त्याने शिकार करून आणलेल्या प्राण्यांचे मांस तो खात असे, परंतु रिबकेने याकोबावर प्रीती केली.
TSK
TSK · योहा 1:13
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
मग इसहाक भीतीने थरथर कापत म्हणाला, “तर मग तू येण्या अगोदर ज्याने मांस तयार करून मला आणून दिले तो कोण होता? मी ते सर्व खाऊन त्यास आशीर्वाद दिला. खरोखर तो आशीर्वादित होईल.”
आणि अब्राहाम तर ‘आमचा पिता आहे’, असे आपसात म्हणण्याचा विचार आपल्या मनात करू नका; कारण मी तुम्हास सांगतो, देव या दगडांपासून अब्राहामासाठी मुले निर्माण करण्यास समर्थ आहे.
येशूने त्यास उत्तर दिले, ‹“मी तुम्हास खरे खरे सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यावांचून कोणीही देवाच्या राज्यांत प्रवेश करू शकत नाही.›
¶ मी ख्रिस्तात खरे सांगतो, मी खोटे बोलत नाही आणि माझा विवेक पवित्र आत्म्यात, साक्ष देत आहे
¶ बंधूंनो, त्यांचे तारण व्हावे, ही माझ्या मनाची कळकळीची इच्छा व माझी त्यांच्याकरिता देवाजवळ विनंती आहे.
कारण इच्छा करणे आणि कार्य करणे तुमच्या ठायी आपल्या सुयोजनेसाठी साधून देणारा तो देव आहे.
आपण त्याच्या निर्मीती मधील जसे काय प्रथमफळ व्हावे म्हणून त्याने सत्यवचनाद्वारे स्वतःच्या इच्छेने आपणाला जन्म दिला.
कारण तुम्ही नाशवंत बीजाकडून नाही पण अविनाशी बीजाकडून, म्हणजे देवाच्या, जिवंत टिकणार्या वचनाच्याद्वारे तुमचा पुन्हा जन्म पावलेले आहात.
¶ म्हणून आता, प्रिय मुलांनो, ख्रिस्तामध्ये राहा, यासाठी की, जेव्हा ख्रिस्त प्रकट होइल, तेव्हा आम्हास धैर्य मिळेल व जेव्हा तो परत येतो तेव्हा त्याच्याद्वारे आम्ही लज्जित केले जाणार नाही.
¶ प्रियांनो, आपण एकमेकांवर प्रीती करावी कारण प्रीती देवाकडून आहे आणि जो कोणी प्रीती करतो तो प्रत्येकजण देवापासून जन्मला आहे आणि देवाला ओळखतो.
कारण प्रत्येकजण जो देवापासून जन्मला आहे तो जगावर विजय मिळवतो आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास.