TSK

TSK · लूक 1:53

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

तरुण सिंहाना देखील उणे पडते आणि ते भुकेले होतात, परंतु जे परमेश्वरास शोधतात त्यांना कोणत्याही चांगल्या गोष्टींची उणीव पडणार नाही.

तो जाचलेल्यांचा न्यायनिवाडा करतो, आणि तो भुकेल्यांना अन्न देतो. परमेश्वर बंदिवानास मुक्त करतो.

‹जे न्यायीपणाचे भुकेले व तान्हेले ते धन्य आहेत, › ‹कारण ते संतुष्ट होतील.›

¶ ‹पण श्रीमंतानो, तुम्हास दुःख होवो कारण तुम्हास अगोदरच सर्व सुख मिळाले आहे.›

¶ ‹कोणीएक श्रीमंत मनुष्य होता तो जांभळे आणि महागडे खादीचे कपडे घालीत असे. प्रत्येक दिवस तो ऐशोआरामात घालवीत असे.›

तो दुःखी झाला आहे हे जेव्हा येशूने पाहिले तेव्हा तो लोकांस म्हणाला, ‹“ज्यांच्याजवळ धन आहे, त्या लोकांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती कठीण आहे!›

¶ तेव्हा येशू त्यांना म्हणाला, ‹“मीच जीवनाची भाकर आहे. माझ्याकडे जो येतो त्यास कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्यास कधीही तहान लागणार नाही.›

तुम्हास ज्याची गरज आहे ते सर्व आधीच तुमच्याकडे आहे. तुम्ही अगोदरच श्रीमंत झाला आहात, तृप्त झाला आहात, तुम्हास असे वाटते की आमच्याशिवाय तुम्ही राजे झाला आहात आणि तुम्ही राजे बनलाच असता तर ठीक झाले असते, कारण आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर राजे बनलो असतो.

¶ धनवान लोकहो ऐका, तुमच्यावर जी संकटे येत आहेत त्याबद्दल रडा व आक्रोश करा.

ते आणखी भुकेले आणि आणखी तान्हेले होणार नाहीत, त्यास सूर्य किंवा कोणतीही उष्णता बाधणार नाही.