TSK

TSK · लूक 13:11

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

हे परमेश्वरा माझ्यावर दया कर, कारण मी अशक्त आहे. हे परमेश्वरा मला निरोगी कर, कारण माझी हाडे ठणकत आहेत.

हे माझ्या जीवा तू निराश का झाला आहेस? माझ्यामध्ये तू का तळमळत आहेस? देवाची आशा धर, कारण त्याच्या उपस्थितीने होणाऱ्या तारणामुळे मी त्याची अजून स्तुती करीन.

परमेश्वर आंधळ्यांचे डोळे उघडतो; परमेश्वर वाकलेल्यांना उभे करतो. परमेश्वर नितीमान लोकांवर प्रेम करतो.

नंतर येशूने त्याच्या वडिलांना विचारले, ‹“किती काळ हा असा आहे?”› वडीलांनी उत्तर दिले, “बाळपणापासून हा असा आहे.

आणि तो जमिनीवर उतरला, तेव्हा नगरातील कोणीएक मनुष्य त्यास भेटला; त्यास पुष्कळ भूते लागली होती व त्याने बऱ्याच काळापासून कपडे घातली नव्हती व घरात न राहता तो थडग्यांमध्ये राहत होता.

‹ही तर अब्राहामाची कन्या आहे. सैतानाने हिला अठरा वर्षे बांधून ठेवले होते. त्या बंधनातून तिला शब्बाथ दिवशी सोडविणे चूक होते काय?”›

¶ त्यांनी त्यांना विचारले, “तुमचा जो मुलगा आंधळा जन्मला म्हणून तुम्ही म्हणता तो हा आहे काय? मग आता त्यास कसे दिसते?”

कारण ज्या मनुष्यावर हा बरा करण्याचा चमत्कार घडला होता तो चाळीस वर्षाहून अधिक वयाचा होता.