TSK

TSK · मार्क 9:35

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

पण तू आपणासाठी मोठ्या गोष्टींची आशा करतोस काय? त्याची आशा करू नकोस. कारण परमेश्वर म्हणतो, पाहा, सर्व मानवावर अरिष्ट येईल, पण जेथे कोठे तू जाशील तेथे तुला तुझे जीवन लूट असे मी देईन.”

‹तुमच्यातील जो सेवक बनून तुमची सेवा करतो तो तुमच्यात सर्वात मोठा होय.›

‹पण जेव्हा तुम्हास आमंत्रित केलेले असेल, तेव्हा जा आणि अगदी खालच्या जागी जाऊन बसा. यासाठी की, जेव्हा यजमान येईल, तेव्हा तो तुम्हास म्हणेल, मित्रा, वरच्या आसनावर येऊन बस. तेव्हा तुझ्या पाहुण्यांसमोर तुझे गौरव होईल.›

‹परंतु तुम्ही तसे नाही. त्याऐवजी तुमच्यातील सर्वांत मोठा असलेल्याने सर्वांत लहान व्हावे व जो अधिकारी आहे त्याने सेवक व्हावे.›