TSK

TSK · गण 20:8

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

परमेश्वरास काही अशक्य आहे काय? येत्या वसंतऋमध्ये, सांगितल्याप्रमाणे मी पुन्हा येईन. पुढील वर्षी साधारण याच वेळी सारा हिला मुलगा होईल.”

तू आपल्या हाती ही तुझी काठी घे. हिच्या योगे तू चिन्हे करशील.”

तेव्हा मोशे व अहरोन यांनी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे केले. अहरोनाने आपली काठी उचलून फारोच्या व त्याच्या अधिकाऱ्यासमोर पाण्यावर मारली. तेव्हा नदीतल्या सर्व पाण्याचे रक्त झाले.

परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू इस्राएल लोकांपुढे जा. त्यांच्यापैकी काही वडील माणसे तुजबरोबर घे. नील नदीच्या पाण्यावर तू जी काठी आपटली होतीस ती हाती घेऊन लोकांच्या पुढे चाल.

मोशेने आपला हात वर उचलला आणि काठीने खडकावर दोन वार केले. खडकातून पाणी बाहेर वाहू लागले आणि माणसे व जनावरे ते पाणी पिऊ लागली.

आमच्या सरदारांनी विहीर खणली, सरदारांनी ही विहीर खणली. त्यांच्या राजदंडानी व आपल्या काठ्यांनी विहीर खणली, मग त्यांनी अरण्यापासून ते मत्तानापर्यंत प्रवास केला.

तेव्हा लोकांनी जयघोष केला आणि कर्णे वाजत राहिले, कर्ण्यांचा आवाज ऐकताच लोकांनी मोठ्याने जयघोष केला आणि तट जागच्या जागी कोसळला; लगेच लोकांनी आपआपल्यासमोर त्या नगरात सरळ चालून जाऊन ते काबीज केले.

कारण तो बोलला आणि ते झाले, त्याने आज्ञा केली आणि ते आपल्या ठिकाणी स्थिर झाले.

त्याने खडक दुभागला आणि त्यातून पाणी उसळून बाहेर आले; ते नदीप्रमाणे वाळवटांत वाहू लागले.

खिन्न झालेले आणि गरजवंत पाण्याचा शोध घेतात, पण तेथे काहीच नाही आणि त्यांची जीभ तहानेने कोरडी पडली आहे; मी परमेश्वर त्यांच्या प्रार्थनेला उत्तर देईल; मी, इस्राएलाचा देव, त्यांना सोडणार नाही.

तो त्यांचे वाळवंटांतून मार्गदर्शन करत असता, त्यांना तहान लागली नाही, त्याने खडकातून त्यांच्यासाठी पाणी वाहायला लावले, आणि त्याने खडक फोडला आणि पाणी बाहेर वाहू लागले.

¶ येशूने उत्तर दिले, ‹“देवावर विश्वास ठेवा.›

येशूने तिला उत्तर दिले, ‹“देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यायला दे असे तुला म्हणणारा कोण आहे, हे तुला समजले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असतेस आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते.”›

हे सर्वजण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरीया, व त्याचे भाऊ एकचित्ताने एकसारखे प्रार्थना करत होते.

¶ नंतर देवदूताने मला जीवनाच्या पाण्याची एक नदी दाखविली. ती नदी स्फटिकासारखी स्वच्छ होती. ती नदी देवाच्या आणि कोकऱ्यांच्या राजासनापासून उगम पावत होती आणि नगराच्या रस्त्यांच्या मधोमध वाहत होती.