TSK

TSK · नीति 10:7

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

या नगराचे रक्षण करून त्यास मी वाचवीन. माझ्यासाठी आणि माझा सेवक दावीद याच्यासाठी मी हे करीन.”

पृथ्वीवरील लोकांस त्याची आठवण राहणार नाही. आता त्याचे नाव रसत्यावर पण कोणी घेत नाही.

आपल्या युद्धाच्या आरोळीने तू राष्ट्रांस भयभीत असे केले आहेस; तू दुष्टाचा नाश केला आहेस. तू त्यांचे नाव सर्वकाळपर्यंत खोडले आहे.

माझे शत्रू माझ्याविषयी वाईट बोलतात. ते म्हणतात, “तो कधी मरेल आणि त्याचे नाव विस्मरणात जाईल?”

परमेश्वरापुढे त्यांचे पातक सदैव असोत; परमेश्वर त्यांचे स्मरण पृथ्वीवरून काढून टाको.

¶ मी दुष्टांना सार्वजनिकरित्या पुरताना बघितले. त्यांना पवित्र जागेतून नेले आणि पुरले आणि त्यांनी ज्या शहरात दुष्ट कामे केली तेथील लोक त्यांची स्तुती करत होते. हेसुद्धा निरुपयोगी आहे.

‹मी तुम्हास खरे सांगतो, सर्व जगात जेथे कोठे सुवार्तेची घोषणा केली जाईल तेथे तिची आठवण म्हणून तिने जे केले ते नेहमीच सांगितले जाईल.”›