TSK

TSK · नीति 15:1

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

मिद्यानाचे राजपुत्र ओरेब व जेब यांच्यावर देवाने तुम्हाला विजय दिला; मी तुमच्या तुलनेत काय साध्य केले आहे?” तेव्हा तो अशी गोष्ट बोलल्यावर त्यांचा त्यावरला राग नाहीसा झाला.

तेव्हा नाबालाने त्याच्या चाकरांना उत्तर देऊन म्हटले, “दावीद कोण आहे? इशायाचा मुलगा कोण? जे आपआपल्या धन्याला सोडून पळतात असे पुष्कळ चाकर या दिवसात आहेत.

इस्राएल लोक म्हणाले, “आमच्याकडे दावीदाचे दहा हिस्से आहेत. तेव्हा तुमच्यापेक्षा आमचा त्याच्यावर जास्त हक्क आहे. असे असून तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष केलेत.” असे का? आम्हास तुच्छ लेखले व राजाला परत माघारी आणण्यापूर्वी आमचा सल्ला घेतला नाही? इस्राएलीं पेक्षाही यहूदींची भाषा कठोर होती.

त्यावेळी राजा रहबाम त्यांच्याशी अतिशय कठोरपणे बोलला. वडिलधाऱ्यांच्या सल्ल्याकडे त्याने दुर्लक्ष केले.

तेव्हा ती वयोवृध्द मंडळी रहबामाला म्हणाली, “तू या लोकांशी प्रेमाने वागलास, त्यांना संतुष्ट केलेस आणि त्यांच्याशी गोड बोललास तर ते चिरकाल तुझी सेवा करतील.”

द्वेष भांडण उत्पन्न करतो; परंतु प्रीती सर्व अपराधांवर झाकण घालते.

धीर धरल्याने राज्य करणाऱ्याचे मन वळते, आणि मऊ जीभ हाड फोडते.

थट्टा करणारे शहराला पेटवतात; पण सुज्ञजन क्रोधापासून दूर निघून जातात.

असे सांगून झाल्यानंतर त्याने जमावाला जाण्यास सांगितले.