जर मी असत्याने चाललो असेल, जर माझ्या पाऊलांनी कपट करण्याची घाई केली असेल,
TSK
TSK · नीति 19:2
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
नीतिमानाचे ओठ पुष्कळांचे पोषण करतात, पण मूर्ख मरतात कारण त्यांच्यात बुद्धीचा अभाव असतो.
परीश्रमपूर्वक केलेल्या योजनांमुळे भरभराट होते, परंतु जो घाईघाईने कृती करतो तो केवळ दरिद्री होतो.
विश्वासू मनुष्यास महान आशीर्वाद मिळतात, पण जो कोणी झटपट श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतो त्यास शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही.
कोणी आपल्या बोलण्यात उतावळा आहे अशा मनुष्यास पाहतोस काय? तर त्याच्यापेक्षा मूर्खाविषयी अधिक आशा आहे.
¶ उपदेशक ज्ञानी होता आणि म्हणून तो लोकांस ज्ञान शिकवीत गेला. त्याने अभ्यास व निरक्षण करून व पुष्कळ म्हणीचा संच केला.
यासाठी परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “पाहा, मी सियोनेत आधारशिला, पारखलेला धोंडा, कोपऱ्याचा मोलवान धोंडा, स्थीर पाया म्हणून घालतो. जो कोणी त्यावर विश्वास ठेवेल, तो लाजवला जाणार नाही.
‹त्यांनी पित्याला आणि मलाही ओळखले नसल्यामुळे ते असे करतील.›
मी अशी प्रार्थना करतो की, तुमची प्रीती ज्ञानात व पूर्ण सारासार विचारात आणखी अधिकाधिक वाढत जावी,