TSK

TSK · नीति 30:13

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

हे परमेश्वरा, माझे हृदय गर्विष्ठ नाही किंवा माझे डोळे उन्मत्त नाही. मी आपल्यासाठी मोठमोठ्या आशा ठेवत नाही, किंवा ज्या माझ्या समजण्या पलीकडे आहेत अशा गोष्टीत मी पडत नाही.

घमेंडखोर दृष्टी व गर्विष्ठ मन दुर्जनांच्या शेतातील उपज हे पाप उत्पन्न करतात.

परमेश्वर म्हणतो सियोनेच्या कन्या अहंकारी आहेत, आणि त्या ताठ मानेने आपले डोके उंचावून चालतात व आपल्या डोळ्यांनी प्रणयचेष्टा करतात, जातांना त्या चोखंदळपणा करतात व आपल्या पायांनी पैंजणाचा रुणझुण आवाज करतात.

तू आपल्या वधणाऱ्यासमोर, मी देव आहे. असे खचित म्हणशील काय? ज्या कोणी तुला भोसकले त्यांच्या हाती तू आहेस तो तू देव नव्हे व मानव आहेस.

पाहा! मनुष्याचा आत्मा गर्विष्ठ झाला आहे, आणि स्वत:च्या ठायीच तो सरळ नाही, परंतू न्यायी आपल्या विश्वासाने वाचेल.