TSK

TSK · 1 पेत्र 3:12

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

¶ मीही त्या मनुष्याच्या विरूद्ध होईन! आणि त्यास आपल्या लोकांतून बाहेर टाकीन! कारण त्याने आपले मूल मोलख दैवतास अर्पून माझे पवित्रस्थान भ्रष्ट केले व माझ्या पवित्र नावाला कलंक लावला!

मी माझे मुख तुमच्याविरुध्द करीन, म्हणून तुमचे शत्रू तुमचा पराभव करतील; जे लोक तुमचा द्वेष करीतात ते तुमच्यावर अधिकार गाजवतील, आणि कोणी तुमचा पाठलाग करत नसतानाही तुम्ही पळाल.

आता माझी दृष्टी याठिकाणी वळलेली आहे. इथे होणाऱ्या प्रार्थना ऐकायला माझे कान उत्सुक आहेत.

परमेश्वर त्याच्या पवित्र स्वर्गात आहे; त्याचे डोळे पाहतात, त्याचे डोळे मनुष्याच्या संतानास पारखतात.

जो तू प्रार्थना ऐकतोस, त्या तुझ्याकडे सर्व मानवजाती येते.

परमेश्वराचे नेत्र सर्वत्र असतात, ते चांगले आणि वाईट पाहत असतात.

परमेश्वर दुष्टांपासून खूप दूर आहे, पण तो नीतिमानांच्या प्रार्थना नेहमी ऐकतो.

“त्याला घेऊन व त्याची काळजी घे. त्यास इजा करु नको. तो जे काही सांगेल ते त्याच्यासाठी कर.”

लहानशा आरंभाच्या दिवसास कोणी तुच्छ लेखले आहे काय? हे सात दिवे म्हणजे सर्व दिशांना पाहणारे परमेश्वराचे डोळेच होत. ते पृथ्वीवरील सर्वकाही पाहतात. आणि ते जरुब्बाबेलाच्या हाती ओळंबा पाहतील व हे लोक मोठा आनंद करतील”

म्हणून एकमेकांकडे आपल्या पापांची कबुली द्या आणि एकमेकांसाठी प्रार्थना करा. यासाठी की, तुम्ही बरे व्हावे. नीतिमान मनुष्याची प्रार्थना सामर्थ्ययुक्त व परिणामकारक असते.