TSK

TSK · 1 पेत्र 4:8

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

मूर्ख त्याचा राग लागलाच दाखवतो, पण जो दूरदर्शी आहे तो अपमानाकडे दुर्लक्ष करतो.

जो कोणी ऐकण्यापूर्वी उत्तर देतो, त्याचे ते करणे मूर्खपणाचे आणि लज्जास्पद असते.

पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती या सर्वांवर धारण करा.

¶ बंधुप्रेमाविषयी आम्ही तुम्हास लिहावे याची तुम्हास गरज नाही; कारण एकमेकांवर प्रीती करावी, असे तुम्हास देवानेच शिकविले आहे;

आणि या आज्ञेचे उद्दिष्ट प्रीती आहे, जी शुद्ध अंतःकरणातून, चांगल्या विवेकभावातून व निष्कपट विश्वासातील असावी.

¶ माझ्या बंधूंनो, मुख्यतः शपथ वाहू नका; स्वर्गाची, पृथ्वीची किंवा दुसरी कशाचीही शपथ वाहू नका. तुम्ही दोषी ठरू नये म्हणून तुम्हास होय म्हणायचे तर होयच म्हणा. तुम्हास नाही म्हणायचे तर नाहीच म्हणा.

¶ तुम्ही जर आत्म्याच्याद्वारे, सत्याचे आज्ञापालन करून, निष्कपट बंधुप्रेमासाठी आपले जीव शुद्ध केले आहे, तर तुम्ही आस्थेने एकमेकांवर मनापासून प्रीती करा.

¶ प्रिय बंधू, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टीत सुस्थिती व आरोग्य असावे, अशी मी प्रार्थना करतो.