मग मोशे व अहरोन फारोकडे गेले. त्यांनी त्यास सांगितले, “इब्र्यांचा देव परमेश्वर म्हणतो, ‘तू माझ्यापुढे नम्र होण्याचे कोठवर नाकारशील? माझी उपासना करण्याकरिता माझ्या लोकांस जाऊ दे.
TSK
TSK · 2 इति 36:12
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
मनश्शेचे हाल झाले तेव्हा त्याने परमेश्वर देवाची करुणा भाकली. त्याच्या पूर्वजांच्या देवासमोर मनश्शे नम्र झाला.
पुढे त्याचे पिता मनश्शे जसे परमेश्वरास नम्रपणे शरण गेले तसा तो गेला नाही. उलट आमोनाची दुष्कृत्ये वाढतच चालली.
¶ यिर्मयाला परमेश्वराकडून आलेले वचन ते असे, जेव्हा राजा सिद्कीयाने मल्कीयाचा मुलगा पशहूर आणि मासेया याचा मुलगा सफन्या याजक या दोघांना यिर्मयाकडे पाठवले. त्याने म्हटले,
परमेश्वर, इस्राएलाचा देव, हे म्हणतो, “जा आणि यहूदाचा राजा सिद्कीया याच्याशी बोलून सांग, पाहा हे नगर मी बाबेलाच्या राजाच्या हाती देईन. तो ते जाळून टाकील.
¶ नंतर सिद्कीया राजाने निरोप पाठवला आणि यिर्मया संदेष्ट्याला परमेश्वराच्या घराच्या तिसऱ्या प्रवेशद्वाराजवळ आपल्याजवळ बोलावले. मग राजा यिर्मयाला म्हणाला, मी तुला काही विचारायचे आहे. माझ्यापासून काही लपवू नकोस.”
¶ हे बेलशस्सरा तू त्याचा पुत्र असून हे सर्व तुला माहीत असूनही तू आपले मन नम्र केले नाहीस.
¶ म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा ह्यासाठी की त्याने तुम्हास योग्यवेळी उंच करावे.