TSK

TSK · 2 राजे 21:2

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तुमचा देव परमेश्वर याच्या बाबतीत तसे करु नका. कारण परमेश्वरास ज्या गोष्टींचा तिटकारा आहे त्या सर्व गोष्टी हे लोक करतात. ते आपल्या देवाकरता आपल्या मुलाबाळांचा होमसुद्धा करतात.

त्याऐवजी तो इस्राएलाच्या राजांच्या मार्गात चालला. आणि जी राष्ट्रे परमेश्वराने इस्राएलाच्या लोकांपुढून घालवली होती, त्यांच्या तिरस्करणीय कर्मांस अनुसरून त्याने आपल्या मुलाचे अग्नीतून अर्पण केले

मनश्शेने अशेराचा कोरीव पुतळा करून तो मंदिरात ठेवला. या मंदिराविषयी दावीद आणि दाविदाचा मुलगा शलमोन यांना परमेश्वर म्हणाला होता, “इस्राएलमधील सर्व वंशातून, या नगरांमधून मी यरूशलेमची निवड केली आहे. यरूशलेममधील मंदिरात मी माझे नाव कायमचे ठेवीन.

आपले वडिल मनश्शे यांच्याप्रमाणेच आमोननेही परमेश्वराच्या दृष्टीने गैर कृत्ये केली.

यहूदाच्या लोकांनी माझा त्याग केला. इतर दैवतांपुढे त्यांनी धूप जाळला. त्यांनी मला संताप आणला, त्यांनी अनेक मूर्तींही केल्या. म्हणून या प्रदेशावर माझा राग आहे. न विझवता येणाऱ्या अग्नीसारखा माझा संताप असेल.

त्याचप्रमाणे याजकांचे प्रमुख, आणि यहूदातील वडिलधारी मंडळी यांचे दुराचरण वाढत चालले आणि त्यांनी अधिकाधिक पातके केली. ते परमेश्वराच्या बाबतीत अप्रमाणिक झाले. इतर देशांची अमंगळ कृत्यांची उदाहरणे त्यांनी समोर ठेवली. या प्रमुखांनी यरूशलेमामधल्या परमेश्वराने पवित्र केलेल्या मंदिराची धूळधान केली.

मग तुम्हास कळेल मी परमेश्वर देव आहे, जो कोणी मूर्ती पुढे चालत नाही आणि ज्यांनी ठरवीले ते बाहेर येणार नाही, त्याऐवजी, सभोवतालच्या राष्ट्राचे निर्णय तुम्ही घेऊन जाल.

मग तू म्हणावे परमेश्वर देव असे म्हणत आहे, असे दिवस येत आहेत की, या शहराच्या मध्य भागात रक्तपात करण्यात आला आहे. शहराने स्वतःला मूर्तीने अपवित्र केले आहे.