आणि सातव्या दिवशी सूर्य मावळण्यापूर्वी त्या नगरातल्या मनुष्यांनी त्यास म्हटले, “मधापेक्षा गोड ते काय? सिंहापेक्षा बळकट काय आहे?” तेव्हा शमशोन त्यांना म्हणाला, “जर तुम्ही माझ्या कालवडीला नांगराला जुंपले नसते, तर तुम्हाला माझे कोडे उलगडता आलेच नसते.”
TSK
TSK · 2 शमु 1:23
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
तेव्हा त्याने त्यास म्हटले, “असे न होवो तू मरणार नाहीस; पाहा माझा बाप लहान मोठे काहीएक कार्य मला सांगितल्या वाचून करीत नाही. तर ही गोष्ट माझा बाप माझ्यापासून कशाला गुप्त ठेवील? असे होणार नाही.”
यवाब, अबीशय आणि असाएल हे सरुवेचे तीन पुत्र. त्यापैकी असाएल हा वेगवान धावपटू होता. अगदी रानातल्या हरीणासारखा चपळ होता.
¶ गादी यांच्यातील काही लोक दावीदाकडे तो वाळवंटातील गढीत असताना आले. ते चांगले शूर लढवय्ये होते. ढाल व भालाफेक हाताळणारे होते. त्यांची तोंडे सिंहाच्या तोंडासारखी भयानक होती. ते डोंगरावरील हरणासारखे वेगाने धावणारे होते.
सिंह सर्व प्राण्यात सगळ्यात बलवान आहे तो कोणापासूनही मागे फिरत नाही.
आमचा पाठलाग करणारे गरुडापेक्षाही वेगवान होते. त्यांनी आमचा डोंगरांत पाठलाग केला. आम्हास पकडण्यासाठी ते रानात दडून बसले.