बंदी करून नेलेल्या शत्रुंच्या देशात असताना ते जर अंत:करणपूर्वक तुझ्याकडे वळले आणि तू त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीच्या दिशेने, तू निवडलेल्या या नगराच्या दिशेने आणि तुझ्या सन्मानार्थ मी बांधलेल्या या मंदिराच्या दिशेने त्यांनी प्रार्थना केली तर
TSK
TSK · प्रेषि 3:19
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
हे देवा, तू आपल्या प्रेमदयेमुळे माझ्यावर दया कर, तुझ्या पुष्कळ दयाळूपणाच्या कृत्यांनी माझ्या अपराधांचे डाग पुसून टाक.
तेव्हा मी पापी लोकांस तुझे मार्ग शिकविन आणि पापी तुझ्याकडे परिवर्तित होतील.
परमेश्वरास नवीन गीत गा, कारण त्याने आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत; त्याने आपल्या उजव्या हाताने आणि आपल्या पवित्र बाहूने आम्हास विजय दिला आहे.
स्वतःला धुवा, स्वच्छ करा; तुमची दुष्ट कृत्ये माझ्या नजरेपासून नाहीशी करा; वाईट करणे सोडा;
त्यांनी डोळ्यांनी पाहू नये किंवा कानांनी ऐकू नये आणि त्याच्या हृदयाने समजू नये, आणि मग पुन्हा वळू नये व बरे होऊ नये म्हणून या लोकांचे हृदय कठीण कर, आणि त्यांचे कान बहीरे, आणि डोळे आंधळे कर.”
मी तुझी बंडखोरीची कृत्ये, दाट ढगाप्रमाणे आणि तुझे पाप आभाळाप्रमाणे, पुसून टाकली आहेत; माझ्याकडे माघारी ये, कारण मी तुला उद्धारीले आहे.”
परमेश्वराचे खंडून घेतलेले आनंदाअश्रूने सियोनास परत येतील आणि त्यांच्या माथ्यांवर सर्वकाळचा हर्ष राहील, ते आनंद व हर्ष पावतील, शोक व उसासे पळून जातील.
“तू वांझ स्त्री, तू जन्म दिला नाहीस; ज्या तुला प्रसूतिवेदना नाहीत, ती तू आनंदाने आणि मोठ्याने आरोळी मारून जयघोष करून गायन कर. कारण परमेश्वर म्हणतो, ‘विवाहित स्त्रीच्या मुलांपेक्षा एकाकी असणाऱ्याची मुले अधिक आहेत.’”
“उठ, प्रकाशमान हो, कारण तुझा प्रकाश आला आहे, आणि परमेश्वराचे तेज तुझ्यावर उगवले आहे.”
त्यांचे वंशज सर्व राष्ट्रांत आणि लोकांमध्ये त्यांचे संतान ओळखले जातील. त्यांना पाहणारे सर्व ते कबूल करतील की, “परमेश्वराने ज्या लोकांस आशीर्वादीत केले आहे, ते हेच आहेत.”
यरूशलेमेवर प्रेम करणारे, तुम्ही सर्व तिच्याबरोबर हर्ष करा आणि तिच्यासाठी उल्लास करा. जे तुम्ही तिच्यासाठी शोक करता, ते तुम्ही सर्व तिच्याबरोबर आनंदाने हर्ष करा.
खचीत मी एफ्राईमाला असे रडताना ऐकले आहे की, ‘तू मला शिक्षा केलीस आणि मला शिक्षा झाली. अप्रशिक्षीत वासराप्रमाणे मला परत माघारी आण आणि मी परत येईन, कारण परमेश्वरा, तू माझा देव आहेस.
¶ “पण परमेश्वर म्हणतो, त्यादिवसानंतर जो करार मी इस्राएलाच्या घराण्याबरोबर करीन तो हाच आहे.” “मी आपले नियमशास्त्र त्यांच्या अंतर्यांमात ठेवीन व त्यांच्या हृदयावर मी ते लिहीन, कारण मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील.
त्या दिवसात आणि त्यावेळी मी दावीदासाठी धार्मिकतेची शाखा वाढवीन आणि ती देशात न्याय आणि धार्मिकता चालवील.
चला तर आपण आपले मार्ग शोधू आणि तपासू आणि परमेश्वराकडे परत फिरू.
तथापि “इस्राएलाच्या घराण्या मी तुम्हातील प्रत्येकाचा तुमच्या मार्गाप्रमाणे मी न्याय करेन.” हे परमेश्वर देव जाहीर करतो, पश्चाताप कर व आपल्या सर्व अपराधापासून मागे वळ जे तुझ्या विरुध्द दुष्कर्माने अडखळण झाले होते.
मग त्यांना सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा, मी इस्राएल लोकांस ज्या राष्ट्रांत ते गेले आहेत, तेथून त्यांना मी बाहेर काढीन. मी त्यांना सभोवतालच्या देशातून गोळा करीन. कारण मी त्यांना त्यांच्या देशात आणीन.
मोशेच्या नियमशास्त्रात लिहील्याप्रमाणे ही सर्व विपत्ती आमच्यावर आली, तरी आम्ही पश्चाताप करून आपला देव परमेश्वर याच्या दयेची आणभाक केली नाही.
कबुलीच्या शब्दासोबत परमेश्वराकडे वळा, त्यास म्हणा, आमचे अधर्म दूर कर आणि दयेने आमचा स्वीकार कर म्हणजे आम्ही तुझी स्तुती करु, आपल्या ओठांचे फळ तुला अर्पू.
परमेश्वर देव सियोनेतून गर्जना करील, आणि आपला आवाज यरूशलेमेतून उंचावील. आकाश व पृथ्वी कापतील पण परमेश्वर आपल्या लोकांस सुरक्षित स्थान, आणि इस्राएलाच्या लोकांस तो दुर्ग होईल.
म्हणून तू आपल्या लोकांस, तुझ्या वतनाचा कळप जो रानात चरतो त्याला, आपल्या काठीने पाळ. जसे ते प्राचीन दिवसात तसे बाशानांत व गिलादांत ते चरोत.
सियोन कन्ये, गा आणि हे इस्राएल, आनंदाने जल्लोष कर! यरूशलेमेच्या कन्ये, आनंद व उल्लास कर!
‹कारण या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे, › ‹ते कानानी मंद ऐकतात आणि त्यांनी डोळे मिटून घेतले आहेत;› ‹यासाठी की, त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, › ‹कानांनी ऐकू नये, › ‹अंतःकरणाने समजून नये› ‹आणि वळू नये› ‹आणि मी त्यांना बरे करू नये.›
तो इस्राएलाच्या संतानांतील अनेकांना, प्रभू त्यांचा देव याच्याकडे वळविण्यास कारणीभूत ठरेल.
¶ मग सर्वजण एकत्र जमले असताना शिष्यांनी येशूला विचारले, “प्रभूजी, याच काळात आपण इस्राएलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय?”
सर्व गोष्टींची सुस्थिती पुनःस्थापित होण्याच्या काळांपर्यंत स्वर्गात त्यास राहणे अवश्य आहे, त्या काळाविषयी युगाच्या आरंभापासून देवाने आपल्या पवित्र संदेष्ट्याच्या तोंडून सांगितले आहे.
प्रभू विश्वास ठेवणाऱ्यांना मदत करीत होता आणि बऱ्याच मोठ्या गटाने विश्वास ठेवला व ते प्रभूला अनुसरू लागले.
आणि त्याने एकापासुन मनुष्यांची सर्व राष्ट्रे निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या संबध पाठीवर रहावे असे केले आहे; आणि त्याचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरविल्या आहेत.
¶ कारण या लोकांचे अंतःकरण जड झाले आहेत त्याच्या कानांनी त्यांना ऐकू येत नाही आणि त्यांनी आपले डोळे बंद केले आहेत नाही तर त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले असते आणि आपल्या कानांनी ऐकले असते आणि माझ्याकडे वळले असते आणि मी त्यांना बरे केले असते.
म्हणून प्रभू येशू प्रकट होण्याच्या समयी ते होईल; तो आपल्या सामर्थ्यवान देवदूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेसहित प्रकट होईल.
जे त्यास विरोध करतात, त्यांना लीनतेने शिक्षण द्यावे कदाचित त्यांनी खरेपण जाणावे म्हणून देव त्यांना पश्चात्ताप करण्याची बुद्धी देईल.
¶ माझ्या बंधूंनो, जर तुमच्यापैकी कोणी चुकला किंवा सत्यापासून दूर भटकला असेल आणि जर कोणी त्यास परत आणले तर पापी मनुष्यास चुकीच्या मार्गावरून तो परत आणतो.
¶ पण प्रियजनहो, ही एक गोष्ट तुम्ही विसरू नये की, प्रभूला एक दिवस हजार वर्षांसमान आणि हजार वर्षे एका दिवसासमान आहेत.