TSK

TSK · प्रेषि 4:17

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

या कृतीमुळे परमेश्वराचा अमस्यावर कोप झाला. परमेश्वराने संदेष्ट्याला अमस्याकडे पाठवले. संदेष्टा राजाला म्हणाला, “अमस्या, त्या लोकांच्या दैवतांची पूजा तू का करत आहेस? त्या दैवतांना तर स्वत:च्याच लोकांचे तुझ्यापासून रक्षण करता आले नाही.”

आता तू त्यांच्या उपस्थितीत पाटीवर लिही आणि पुस्तकावरही कोरून ठेव, अशासाठी की पुढल्या काळासाठी साक्षी म्हणून ते साठून राहील.

सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, हे म्हणतो, कारण जे सर्व लोक यरूशलेमेत आहेत त्यांच्याकडे व मासेयाचा मुलगा याजक सफन्या व सर्व याजक यांच्याकडे तू आपल्या नावाने पत्रे पाठवून व म्हटले,

¶ तुम्ही वर पाहत होता तेव्हा कोणा मनुष्याचा हात लागल्यावाचून एक दगड छेदला गेला आणि त्याने त्या पुतळ्याच्या लोखंडाच्या व मातीच्या पावलांवर आदळून त्यांचे तुकडे तुकडे केले.

¶ अमस्या आमोसला म्हणाला, “अरे द्रष्ट्या, खाली यहूदात पळून जा आणि तेथेच भाकर खाऊन तुझे प्रवचन दे.

म्हणून तीन दिवसापर्यंत कबरेवर कडक पहारा ठेवण्याची आज्ञा करा. कारण त्याचे शिष्य येऊन त्याचे शरीर चोरुन नेण्याचा प्रयत्न करतील. मग तो मरणानंतर पुन्हा उठला असे लोकांस सांगतील. ही शेवटची फसवणूक पहिल्यापेक्षा अधिक वाईट होईल.”

तेव्हा त्यांनी त्यांना आणखी धमकावून सोडून दिले, कारण लोकांमुळे त्यांना शिक्षा कशी करावी. हे त्यांना काहीच सुचेना, कारण घडलेल्या गोष्टीवरून सर्व लोक देवाचे गौरव करीत होते.

हे वर्तमान ऐकून याचा काय परिणाम होईल, ह्याविषयी परमेश्वराच्या भवनाचा सरदार व मुख्य याजक लोक घोटाळ्यात पडले.

परंतु ते देवाचे असल्यास तुम्हास ते नष्ट करता यावयाचे नाही, तुम्ही मात्र देवाचे विरोधी ठराल.”

कारण परराष्ट्रीयांना आज्ञांकित करावे म्हणून, ख्रिस्ताने माझ्याकडून घडवले नाही असे शब्दाने आणि कृतीने काही सांगायला मी धजणार नाही.

त्या यहूद्यांनी प्रभू येशूला व संदेष्ट्यांनाही जिवे मारिले आणि आमचा छळ करून आम्हास बाहेर घालविले; ते देवाला संतोषवीत नाहीत व सर्व मनुष्यांचेही विरोधी झाले आहेत;