TSK

TSK · आमो 4:7

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तर ज्या गोशेन प्रातांत माझे लोक राहतात, तो मी त्या दिवशी वेगळा करीन, तेथे गोमाश्यांचे थवे जाणार नाहीत. यावरुन पृथ्वीवर मीच परमेश्वर आहे हे तुला समजेल.

गोशेन प्रांतात इस्राएल लोक राहत होते तेथे गारांचा मुळीच वर्षाव झाला नाही.

¶ या नंतरही जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळणार नाही; तर तुमच्या पापाबद्दल मी तुम्हास सातपट शिक्षा करीन.

¶ एवढे सर्व करुनही तुम्ही माझे ऐकले नाही व तुम्ही माझ्याविरूद्ध वागला,

आकाशात ढग दिसणार नाही. आकाश लखलखीत पितळेसारखे तप्त आणि पायाखालची जमीन लोखंडासारखी घट्ट होईल.

त्यांनी तुझ्याविरूद्ध पाप केल्यामुळे आकाशकपाटे बंद झाली व पाऊस पडला नाही. तेव्हा ते जर या ठिकाणाकडे तोंड करून तुझी प्रार्थना करतील व तुझे नाव कबूल करतील व तू दीन केल्यामुळे तुझ्याकडे वळतील,

मी तो उजाड करीन, त्यास खच्ची करणार नाहीत व कुदळणार नाहीत, पण तण व काटेकुटे फुटतील, तेथे पाऊस न पाडण्याची मी ढगांना आज्ञा करीन.”

यहूदातील लोक आपल्या हृदयात म्हणत नाहीत, परमेश्वर आपला देव, जो योग्य वेळेला आगोटीचा व वळवाचा पाऊस पाडतो. आणि आमच्याकरता नेमलेले आठवडे राखतो, त्याचे भय आपण धरू या.

ह्यामुळे जमीनीत भेगापडल्या आहेत, कारण भूमीवर कोठेही पाणी नाही. म्हणून शेतकरी लज्जीत होऊन आपली डोकी झाकत आहे.

शेतांचा नाश झाला आहे. आणि भूमी रडते. कारण धान्याचा नाश झाला आहे, नवा द्राक्षरस सुकून गेला आहे आणि तेल नासले आहे.

यास्तव तुमच्यापासून आकाशाने दहिवराला आवरून धरले आहे व भूमीने आपला उपज रोखून धरला आहे.”

‹अजून चार महिन्यांचा अवकाश आहे, मग कापणी येईल, असे तुम्ही म्हणता की नाही? पाहा, मी तुम्हास म्हणतो, आपली नजर वर करून शेते पाहा; ती कापणीसाठी पांढरी होऊन चुकली आहेत.›

एलीया हा आपल्यासारख्या स्वभावाचा मनुष्य होता. पाऊस पडू नये म्हणून त्याने कळकळीने प्रार्थना केली आणि नंतर साडेतीन वर्षे देशात पाऊस पडला नाही.