TSK

TSK · दानि 2:21

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

देवाच्या आत्म्याने त्यास परिपूर्ण भरले आहे; आणि सर्व प्रकारची कामे करण्यासाठी मी त्यास अक्कल, बुद्धी व ज्ञान ही दिली आहेत.

परमेश्वर गरीब करतो व श्रीमंतही करतो. तो नम्र करतो, तसेच तो उंचही करतो.

राजाचा हा न्याय इस्राएल लोकांच्या कानावर गेला. राजाच्या चाणाक्षपणाबद्दल त्यांना भय वाटले. योग्य निर्णय घेण्याचे परमेश्वराचे शहाणपण त्याच्याकडे आहे हे त्यांच्या लक्षात आले.

पृथ्वीवरील सर्व लोक त्यास भेटण्यास उत्सुक असत. देवाने शलमोनाला दिलेले बुध्दीचे वैभव त्यांना अनुभवायचे असे.

त्याचे पराक्रम आणि त्याची कारकीर्द, इस्राएल आणि सर्व देश यांच्यावर या काळात आलेले प्रसंग याची हकीकत या ग्रंथांमध्ये आहे.

¶ तेव्हा काळ जाणणाऱ्या सुज्ञ मनुष्यांना राजाने म्हटले, कारण कायदा आणि न्याय जाणणारे अशा सर्वांच्यासंबंधी सल्ला घ्यायची राजाची प्रथा होती.

शक्तीशाली लोकांचा तो चुराडा करतो, आणि त्यांच्या स्थानी दुसरा स्थापीतो, त्यास त्यांना प्रश्न विचारण्याची गरज वाटत नाही.

विजयाविषयी इतकी खात्री बाळगू नका; आपले डोके उंच करून बोलू नका.

कारण परमेश्वर ज्ञान देतो, त्याच्या मुखातून सुज्ञता आणि ज्ञान येतात.

¶ प्रत्येक गोष्टीला नेमलेला समय असतो आणि आकाशाखाली प्रत्येक कार्याला समय असतो.

पण जर तुम्ही मला स्वप्न सांगितले नाही तर तुमच्यासाठी एकच शिक्षा आहे. म्हणून माझे मन बदलत नाही तोपर्यंत तुम्ही खोट्या आणि फसव्या गोष्टी सहमत करून मला सांगाव्या असे तुमचे ठरले आहे. म्हणून मला स्वप्न सांगा म्हणजे मला समजेल तुम्ही त्याचा उलगडा करु शकता.”

¶ हा निर्णय त्या देवदुताच्या घोषणेद्वारे आणि पवित्रजनांच्या विचाराने झाला आहे, यासाठी की मनुष्याच्या राज्यात परात्पर प्रभुत्व करतो, आणि ज्या कोणाला ते द्यायला तो इच्छितो त्यास तो ते देतो, आणि त्यावर मनुष्यातल्या सर्वांहून नीच अशा मनुष्यास तो स्थापतो, असे जिवंतांनी जाणावे.

तुला लोकातून काढून टाकण्यात येईल तुझी वस्ती वनपशूत होईल तुला बैलांसारखे गवत खावे लागेल आणि मानवी राज्यावर देवाची सत्ता आहे, तो ते पाहिजे त्यांना देतो, हे तुला ज्ञान होईपर्यंत सात वर्षे जातील.”

काही वर्षानंतर जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा आपसात मिलाप करतील. दक्षिणेच्या राजाची मुलगी उत्तरेच्या राजाकडे कराराची खात्री करण्यास येईल पण तिचे बळ निघून जाईल व तिला सोडून देण्यात येईल ती आणि ज्यांनी तिला आणले ते तिचे वडील आणि तिला त्यावेळी मदत करणारा सोडून देण्यात येईल.

‹कारण मी तुम्हास असे शब्द व अशी बुद्धी देईन की ज्यामुळे त्यांना तुमचा विरोध करायला किंवा तुमच्याविरुध्द बोलायला मुळीच जमणार नाही.›

कारण तो ख्रिस्त येशूमध्ये तुमच्या जीवनाचा उगम आहे व तो देवाची देणगी म्हणून आपले ज्ञान, आपले नीतिमत्त्व, आपले पवित्रीकरण आणि आपली मुक्ती असा झाला आहे.

प्रत्येक उत्तम दान व परिपूर्ण देणगी देवाकडून आहे. जो बदलत नाही व फिरण्याने छायेत नाही अशा स्वर्गीय प्रकाश असणाऱ्या पित्यापासून ते उतरते.

त्याच्या झग्यावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू असे नाव लिहिलेले आहे.