TSK

TSK · अनु 23:21

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

मग याकोबाने शपथ वाहून नवस केला, तो म्हणाला, “जर देव माझ्याबरोबर राहील आणि ज्या मार्गाने मी जातो त्यामध्ये माझे रक्षण करील, आणि मला खावयास अन्न व घालण्यास वस्त्र देईल,

व माझा राग तुम्हावर भडकेल व मी तुम्हास तलवारीने मारून टाकीन म्हणजे तुमच्या स्रिया विधवा व तुमची मुले पोरकी होतील.

¶ मोशे इस्राएलाच्या सर्व वंशप्रमुखांशी बोलला. तो म्हणाला, परमेश्वराने जी काही आज्ञा दिली ती ही आहे.

परक्याकडून हवी तर वसुली करावी, पण तुझ्या बांधवाकडे तुझे काही येणे असेल तर ते तू सोडून दे.

जेव्हा तो पैसे उधार देतो तेव्हा व्याज घेत नाही, जो निर्दोष लोकांविरूद्ध साक्ष देण्यासाठी लाच घेत नाही. तो, जो या गोष्टी करतो तो कधीही ढळणार नाही.

मी होमार्पणे घेऊन तुझ्या घरात येईन; मी तुला केलेले नवस फेडीन.

मी त्याच्या सर्व लोकांसमोर परमेश्वरास केलेले नवस पूर्ण करीन.

त्याने कर्जासाठी कुठलेही व्याज घेतले नाही, वाजवी पेक्षा जास्त नफा घेतला नाही जर त्याने न्यायत्व केले व लोकांमध्ये विश्वासूपण निर्माण केला.

परंतु मी आभार मानण्याच्या वाणीने तुझ्याकडे यज्ञ अर्पण करीन; जो नवस मी केला आहे तो मी पूर्ण करीन, तारण परमेश्वराकडूनच आहे.”

¶ ‹आणखी ‘खोटी शपथ वाहू नको’ तर ‘आपल्या शपथा परमेश्वरापुढे खऱ्या कर’ म्हणून प्राचीन काळच्या लोकांस सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे.›