TSK

TSK · निर्ग 13:2

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तेव्हा उदरातून निघालेला प्रथम पुरुष व जनावराच्या पोटचा प्रथम वत्स यांना परमेश्वरासाठी वेगळे करावे, सर्व नर परमेश्वराचे होत.

आपल्या हंगामातले व आपल्या फळांच्या रसातले मला अर्पण करण्यास हयगय करू नको. तुझा प्रथम जन्मलेला पुत्र मला द्यावा;

प्रत्येक प्रथम जन्मलेला माझा आहे; तसेच तुझ्या गुरांढोरापैकी गायीचे व मेंढराचे प्रथम जन्मलेले नरवत्स माझे आहेत.

“सर्व प्रथम जन्मलेले माझेच आहेत. मी मिसर देशात सर्व प्रथम जन्मलेल्यांना मारून टाकले. त्याच दिवशी इस्राएल लोकांतील पुरुषांपैकी व पशूपैकी प्रथम जन्मलेले सर्व मी आपणासाठी पवित्र ठरवले. ते माझेच आहेत. मी परमेश्वर आहे.”

स्त्रीचे पहिले मूल आणि जनावराचे पहिले पाडस परमेश्वरास अर्पण केलेच पाहिजे. ते मूल तुझे असेल. जन्माला आलेले पहिले पाडस जर अशुद्ध असेल तर ते परत मागे विकत घेतले पाहिजे. जर ते मूल असेल तर ते परत मागे विकत घेतले पाहिजे. ते मूल परत त्या कुटुंबाचे होईल.

आमचा प्रथम पुत्र आणि आमची गुरेढोरे, शेळया मेंढ्या यांचे प्रथम पिलू यांना आम्ही आमच्या देवाच्या मंदिरात सेवेला असलेल्या याजकांकडे आणू.

म्हणजे प्रत्येक प्रथम जन्मलेला नर प्रभूसाठी पवित्र म्हटला जावा असे जे प्रभूच्या नियमशास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे करावे.